आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.च्या सभेत आज अर्थसंकल्प हाेणार सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महसुली उत्पन्न घटल्याने तुटीचा १८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे. यासह या सभेत अन्य १३ विषयही मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प कमी रकमेचा असून, या वर्षी महसुली उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्याचा परिणाम अर्थसंकल्पावर झाला आहे. जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्न घटत असल्याने यामागील कारण शोधण्यासह ते वाढवण्याच्या मुद्यावरही या वेळी सदस्यांकडून जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.

या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नाच्या २०१५-२०१६च्या सुधारित सन २०१६-२०१७च्या मूळ अंदाजपत्रकासह सेस फंडातील २० टक्के निधीच्या रकमेसही मंजुरी दिली जाणार आहे. यासह जनसुविधा चौदाव्या वित्त आयोगातील त्रुटींबाबतही प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. शिक्षण, समाजकल्याण, कृषी, पशुसंवर्धन, महिला-बालकल्याण विभागातील एकाही विषयाचा समावेश सभेच्या विषयपत्रिकेत नाही. या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीची बैठक जि.प.अध्यक्षा प्रयागबाई कोळी सीईअाे आस्तिककुमार पांडेय यांनी घेतली. अर्थसंकल्पीय सभेत महत्त्वाचे विषय मार्गी लागावे विषयपत्रिकेत घ्यावे यासाठी सदस्यांची सायंकाळी उशिरापर्यंत लगबग सुरू होती.

यांना मिळणार मंजुरी
>पाणीपुरवठा योजनांना लागणारी टीसीएल पावडर तुरटी खरेदीच्या ई-निविदेस मान्यता.
>टंचाई अंतर्गत विंधन विहिरींची कामे, कूपनलिका हातपंप खरेदीसाठी ९० लाख खर्चाच्या ई-निविदेस मान्यता देणे.
>पाणीपुरवठा त्रिस्तरीय योजनेंतर्गत कर्मचारीपदांना मुदतवाढ याेजना देखभालीस मान्यता.
>आमदार निधी योजनेंतर्गत वर्षांवरील देयकास मान्यता देणे.
>बांधकाम विभागासाठी संगणक संच खरेदीस मान्यता देणे.
> प्रा.अा. केंद्र, किनगावची जागा ग्रामीण रुग्णालयाकडे वर्ग करणे.
>ग्रामनिधीतून ग्रामपंचायतींच्या कर्ज प्रस्तावास मान्यता देणे.
बातम्या आणखी आहेत...