आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी एकादशीनिमित्त अाज भरगच्च कार्यक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगीरथ स्कूलमध्ये कलाशिक्षक अनिल शेलकर, तुषार जाेशींनी रेखाटलेली माउलींची कलाकृती - Divya Marathi
भगीरथ स्कूलमध्ये कलाशिक्षक अनिल शेलकर, तुषार जाेशींनी रेखाटलेली माउलींची कलाकृती
जळगाव -आषाढी एकादशी निमित्त साेमवारी शहरातील विविध मंदिरे, स्वयंसेवी संस्था, संघटना, संगीत मंडळांसह शाळा-महाविद्यालयांमध्ये भरगच्च कार्यक्रम अायाेजित करण्यात अाले अाहेत.
ओंकारेश्वर मंदिरात अभिषेकाचा कार्यक्रम
श्री.ओंकारेश्वरदेवस्थान चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ओंकारेश्वर मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी त्रिकाल अभिषेक पूजनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अाले आहे. सकाळी ते वाजेदरम्यान षाेडोपचार

अभिषेक पूजन, सकाळी १० वाजता रुद्राभिषेक, दुपारी १२ वाजता अभिजित मुहूर्ताला १०८ निरंजनाद्वारे महाआरतीचा कार्यक्रम, ते वाजेदरम्यान रुद्राभिषेक पूजन सायंकाळी वाजता महाआरती होईल.

माउली मित्र मंडळातर्फे अाज मंदिरात कीर्तन
माउलीमित्र मंडळातर्फे अाषाढी एकादशीनिमित्त २७ जुलै राेजी मनाेज कुळकर्णी महाराज यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. रात्री ते १० वाजेदरम्यान शांतिनिकेतन हाैसिंग साेसायटी, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, एमअायडीसी परिसरात हा कार्यक्रम हाेणार अाहे, असे अनिल वाणी यांनी कळवले अाहे.
‘विवेकानंद’तर्फे महादिंडी अन‌् भक्ती महाकुंभ
विवेकानंदप्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी ‘महादिंडी’ ‘भक्ती महाकुंभ’चे आयोजन करण्यात अाले आहे. त्यानुसार सकाळी वाजता सागर पार्क मैदानावर शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांच्या वारकरी िदंड्या एकत्र येणार अाहेत. या वेळी पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर उपस्थित राहतील.

चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे ‘बोलावा विठ्ठल...’
वसंतरावचांदोरकर प्रतिष्ठानतर्फे सोमवारी सायंकाळी वाजता कांताई सभागृहात ‘बोलावा विठ्ठल...’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात अाला अाहे. त्यात काशिनाथ पलोड, ला.ना. हायस्कूल, ओरियन स्कूल, प.न.लुंकड, सेंट जोसेफ आदी शाळांचे िवद्यार्थी सहभागी हाेणार अाहेत. तसेच दिंडी काढून दिंडीतील विविध खेळ खेळले जाणार अाहेत. त्यांचे दिग्दर्शन ‘अनुभूती’चे ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले असून, नृत्याविष्कार नूपुर खटावकर यांनी केला आहे.

ज.सु.खडके विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी
ज.सु.खडकेप्राथमिक विद्यालयात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एकादशीनिमित्त वारकरी दिंडीचे आयोजन केले आहे. सकाळी विद्यामंदिरात पालखीपूजनाचा कार्यक्रम होईल. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सिंधू कोल्हे, नगरसेविका खुशबू बनसोडे, मंगला चौधरी, पद्मा सोनवणे, लीना पवार अादी उपस्थित राहतील. विद्यार्थ्यांची वारकरी िदंडी भाग्यलक्ष्मी टेंट, श्रीराम चौक, तेली चौक, श्रीराम मंदिर, विठ्ठल मंदिरमार्गे शाळेत येईल.