आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Toilet Less School At Jalgaon Permission Cancel?

शहरातील शौचालये नसलेल्या 25 शाळांची मान्यता रद्द होणार?

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: शौचालये नसणार्‍या शहरातील महापालिकेच्या चार व अन्य खासगी 21 अशा 25 शाळांवर त्यांची मान्यता रद्द होण्याची वेळ आली आहे. संबंधित शाळांना 31 मार्चपर्यंत शौचालये बांधण्याबाबतची नोटीस पालिकेतर्फे बजावण्यात येणार आहे. या शाळांमध्ये काही नगरसेवकांच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे.
शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची सुविधा नसलेल्या शाळांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यामध्ये जळगाव महापालिका हद्दीतील 200 शाळांपैकी 25 शाळांमध्ये शौचालये नसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी महापालिकेतर्फे संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व संस्थाचालकांना नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच त्यांनी 31 मार्चपर्यंत शौचालये न बांधल्यास त्या शाळांची मान्यता रद्द करण्याबाबत शासनाकडे अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे उपायुक्त भालचंद्र बेहरे यांनी स्पष्ट केले.
या शाळांवर कारवाईची टांगती तलवार
पालिकेच्या शाळा क्र.11, 19, 21 व 49, उर्दू शाळा क्र.2 तसेच सिद्धिविनायक प्रायमरी, इंग्लिश मीडियम, जळगाव इंग्लिश स्कूल, अलहिरा उर्दू शाळा, शारदा कॉलनी, बाहेती विद्यालय, राष्ट्रीय बालकामगार शाळा क्र.1, अलहक उर्दू प्रायमरी स्कूल, ग्रामविकास विद्यालय-पिंप्राळा, विद्याविकास प्रायमरी स्कूल, भा.क.लाठी विद्यामंदिर, अभिनव प्रायमरी सराव पाठशाळा, रमाबाई आंबेडकर माध्यमिक विद्यालय-मेहरूण, राज प्रायमरी स्कूल-मेहरूण व उत्कर्ष विद्यालय व त्र्यंबकनगर प्रायमरी स्कूल यांचा समावेश आहे.