आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगाव जिल्ह्यातील आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये ‘टोल फ्री’ची सुविधा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल (जि. जळगाव) - बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. कोणतीही अडचण जाणवल्यास मुलींना तक्रार नोंदवता यावी म्हणून टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आश्रमशाळांसह वसतिगृहांत दर्शनी भागात या क्रमांकाचे फलक लावण्यात आले आहेत.

यावल प्रकल्प कार्यालयांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १८ शासकीय निवासी आदिवासी आश्रमशाळा तर ३२ अनुदानित शाळांचा कारभार चालतो. मुला- मुलींच्या १७ वसतिगृहांचे कामकाज प्रकल्प विभागातर्फे पाहिले जाते. प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी ही टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. २४ तास ही सेवा असून, तक्रारींची दखल थेट विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात घेतली जाईल. टोल फ्री क्रमांकासोबत यावल प्रकल्प कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात अाली.

धुळ्यात सात पथकांद्वारे आश्रमशाळा तपासणी
आश्रमशाळांच्या तपासणीसाठी धुळे जिल्ह्यात ७ पथके नेमण्यात आली असून बुधवारपासून तपासणी सुरू झाली आहे. २२ नोव्हेंबरपर्यंत त्याचा अहवाल देण्यात येणार आहे. अनेक अाश्रमशाळांमध्ये पुरेशा सुविधा नसल्याचे उघडकीस आले आहे. पथकातील महिला अधिकारी सुविधा व सुरक्षेची पाहणी करत आहेत. विद्यार्थिनींशी बोलून अडचणी समजून घेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...