आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tomorrow Medical Cet Issue At Jalgoan, Divya Marathi

वैद्यकीय प्रवेशासाठी उद्या ‘सीईटी’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत गुरुवारी सामाजिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 3939 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेदरम्यान जळगाव शहरातील 11 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

राज्यात 124 महाविद्यालयांमध्ये 5710 जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी 1 लाख 53 हजार 229 विद्यार्थ्यांनी एमएच सीईटीसाठी अर्ज केला आहे. शासनामार्फत डॉ. गिरीश ठाकरे यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना www.mhcet2014.co.in या संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहेत. 14 जूनपर्यंत या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाणार आहे. जिल्ह्यात 3800 विद्यार्थी इंग्रजी, 98 उर्दू तर 41 विद्यार्थी मराठी माध्यमातून पेपर सोडवणार आहेत. 11 अपंग विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली.
अशी असेल बैठक व्यवस्था
बैठक क्रमांक- एमजे कॉलेज कॉर्मस बिल्डिंग- 1700001 ते 1700264- तळमजला, 1700265 ते 1700648- पहिला मजला, 1700649 ते 1701032- दुसरा मजला, ए.टी.झांबरे विद्यालय-1701033 ते 1701392, शासकीय अभियांत्रिकी- 1701393 ते 1701776, आयएमआर-1701777 ते 1702208, केसीई अभियांत्रिकी- 1702209 ते 1702688, अँड. बबन बाहेती महाविद्यालय- 1702689 ते 1703072, ला.ना. हायस्कूल- 1703073 ते 1703432, आर.आर.विद्यालय- 1703433 ते 1703800, (उर्दू माध्यम) 170001 ते 1730016 , भाऊसाहेब राऊत हायस्कूल- (उर्दू माध्यम) 1730017 ते 1730098, (मराठी माध्यम) 1740001 ते 1740041.
5710 जागांसाठी राज्यातून दीड लाख, जिल्ह्यातून चार हजार विद्यार्थी देणार पेपर