आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रनिकेतनची उद्यापासून सुरू हाेणार प्रवेशप्रक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला १६ जूनपासून प्रारंभ होत अाहे. १६ जून ते १४ ऑगस्टपर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे. राज्यात तंत्रनिकेतनची ४९२ महाविद्यालये असून त्यात एक लाख ७९ हजार ९४५ जागा उपलब्ध आहेत. यात उत्तर महाराष्ट्रातील महाविद्यालयांची संख्या ७६ असून प्रवेश क्षमता सुमारे २० हजार इतकी आहे.

तंत्रनिकेतन ऑनलाइन प्रवेशासाठी www.dtemaharashtra.gov.in/poly2015 हे संकेतस्थळ विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार अाहे.

असा घ्यावा प्रवेश
>१६ ते २९ जून : अर्जविक्री, स्वीकृती, कागदपत्रांची पडताळणी.
>जुलैअखेर अंतिम गुणवत्ता यादी.
>१० जुलैपर्यंत पहिल्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरून निश्चिती करणे.
>१३ जुलै रोजी पहिल्या फेरीतील जागावाटपाची तात्पुरती यादी.
>१४ ते १७ जुलैदरम्यान विद्यार्थी जागा वाटपानुसार संस्थांमध्ये नोंदणी.
>२० जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी संस्थांतील जागांची यादी जाहीर होईल.
>२७ जुलैला दुसऱ्या फेरीतील यादी.
>२८ ते ३१ जुलै संस्थांमध्ये नोंदणी.
>१० ऑगस्टला समुपदेशन फेरी.
>१० ते १४ ऑगस्ट संस्थांमध्ये नोंदणी.