आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघर्ष माेर्चासाठी मुख्य रस्ते वाहतुकीसाठी असतील बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात उद्या शनिवारी सकाळी अॅट्राॅसिटी संघर्ष महामाेर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने वाहतुकीची काेंडी हाेऊ नये यासाठी शहरातील विविध भागांतील रस्त्यांवरील वाहतूक सकाळी सहा ते सायंकाळी सात या वेळेत वळवण्यात आली असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी दिली.
मोर्चाला भारतरत्न डाॅ. बाबासाहेब अांबेडकर पुतळ्यापासून प्रारंभ होणार आहे. मोर्चाचा समारोप जिल्हा कारागृहासमाेर होणार आहे. माेर्चात सहभागी होण्यासाठी जिल्हाभरातून नागरिक येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी उद्या, शनिवारी वाहतूकव्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार वरखेडी राेड, चाळीसगाव चाैफुली, साेसायटी पेट्राेलपंप (पाण्याची टाकी) जवळील रस्ता, चक्करबर्डी राेड, जुना टाेल नाका, साक्री बायपास, अभियंतानगर हे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात अाले अाहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा िकंवा माेर्चाच्या वेळेत महत्त्वाचे काम असेल तरच शहरात यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, एस.टी.महामंडळाच्या बसेसचा मार्ग वळवण्यात येणार आहे.
या रस्त्यांवर सर्व वाहनांना प्रवेश बंद

}वरखेडी राेड
} मायक्राे टाॅवर
} साेसायटी पेट्राेलपंप-पाण्याची टाकी
} चक्करबर्डी राेड
} जुना टाेल नाका, साक्री बायपास
} साक्री बायपास चौफुली, कृष्णाई हाॅटेलजवळ
} अभियंतानगर, िरक्षा स्टाॅप

शहरात शनिवारी काढण्यात येणाऱ्या संघर्ष मोर्चासाठी शुक्रवारी जागृतीसाठी महिलांनी दुचाकी रॅली काढली. या रॅलीतून संघर्ष मोर्चाचा संदेश देण्यात आला.
माेर्चामुळे चाैदा रस्त्यांवरील वाहतुकीच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. या रस्त्यांवरून गरजेनुसार पाेलिसांची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने जाऊ शकतील. गरज पडल्यास या वाहनांना रस्ते मोकळे करून देण्याची सूचना माेर्चाच्या अायाेजकांना देण्यात आली आहे.

पर्यायी रस्त्यांचा वापर करा
या रस्त्यांवर मोर्चा वाहनांना प्रवेश
}नगावबारी, नरडाणा चाैफुली
} िबलाडी चाैफुली हायवे
} पाराेळा चाैफुली हायवे
} चाळीसगाव चाैफुली
} रेसिडेन्सीसमाेरील गावात येणारा राेड
} स्टेडियम, वाडीभाेकर राेड
बातम्या आणखी आहेत...