आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखण्या ‘तोरणमाळ’ला हवाय सुविधांचा साज!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नंदुरबार - जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे पर्यटनस्थळ राज्यात प्रसदि्ध आहे. पावसाळयात नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी सुटीच्या दविशी पर्यटकांची या ठिकाणी नेहमीच गर्दी होते. येथील सोयी-सुविधा वाढवल्यास आदिवासींना रोजगार उपलब्ध तर होईलच शविाय नंदुरबारचे नावही राष्ट्रीय स्तरावर पोहोचू शकते; परंतु केवळ राजकीय इच्छाशक्तीअभावी या भागाचा हवा तसा विकास झालेला नाही. पर्यटन विकास महामंडळाने या भागासाठी आठ कोटींचा विकासनिधी दिला होता; परंतु त्याचा योग्य विनियोग केल्याने तो परत पाठविण्याची नामुष्की ओढवली.

सातपुड्याच्या तिस-या चौथ्या रांगेत असलेले अक्राणी तालुक्यातील तोरणमाळ हे पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून एक हजार १३४ मीटर उंचीवर आहे. शहाद्यापासून अवघ्या ५५ किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. या पर्यटन स्थळाजवळ कुठलेही मोठे शहर नसल्याने पर्यटकांची तुरळक गर्दी असते. त्यामुळे चोखंदळ पर्यटक शांत अशा तोरणमाळला येणे पसंत करतात. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे पर्यटनस्थळ राज्यातील क्रमांक दोनचे उंचावर असलेले थंड हवेचे ठिकाण मानले जाते. तोरणमाळला ३१ डिसेंबरला पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते; राजकीय नेत्यांना तसेच शासकीय अधिका-यांना हे पसंतीचे ठिकाण असल्याने अधूनमधून या स्थळांवर बैठका पार पडतात. केवळ तोकड्या सोयी-सुविधांमुळे पर्यटक या भागात जास्त काळ थांबू शकत नाहीत. पावसाळयात तसेच सुटीच्या दविसांत राहण्यासाठी हॉटेल्स, रिसॉर्ट, खानपान सुविधा असे काहीच उपलब्ध होत नसल्यामुळे पर्यटक या ठिकाणी थांबत नाहीत. जर योग्य त्या सोयी-सुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या तर या भागातील आदिवासी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक चक्र सुरळीत होऊ शकते.


तोरणमाळमध्ये असलेल्या सीताखाई पॉइंटवरून सातपुड्याच्या पर्वतरांगांचे विहंगम दृश्य अनुभवता येते.

आठ कोटी गेले परत
जिल्ह्यातीलतोरणमाळच्या विकासासाठी पर्यटन विकास महामंडळाने तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी दिला होता; परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा निधी परत गेला. या आठ कोटींमध्ये रोप-वे, हेलीपॅड स्थळ आदी सुविधांचे नियोजन होते. दुर्दैवाने या दोन्ही सुविधा होऊ शकलेल्या नाहीत.

- सीताखाईचा धबधबा- हाधबधबा पाहण्यासाठी कठडा बांधण्यात आलेला आहे. पावसाळयात धबधबा पाहताना मन मोहून जाते.
- कमल तलाव- पावसाळयातयात कमळ फुललेली दिसतात. श्रावणात ही कमळे पर्यटकांना आकर्षित करतात.
- यशवंत तलाव- हातलाव कधीही आटत नाही. पावसाळयात हा तलाव ओसंडून वाहतो.
- खडकी पॉइंट- सातपुड्याच्यापर्वतरांगा हिरव्या दुलाईने आच्छादलेल्या दिसतात.
- गोरक्षनाथ मंदिर- यशवंततलाव पूर्ण भरल्यानंतर येथे नयनरम्य धबधबा निर्माण होतो.

अन्य वैशिष्ट्ये
तोरणमाळलागोरक्षनाथांचे मंदिर आहे. महाशविरात्रीला मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख भाविक दर्शनासाठी येत असतात. मच्छिंद्रनाथांची गुहा याच ठिकाणी आहे. थंड हवेचे ठिकाण असल्याने अलीकडे स्ट्राॅबेरीची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे सिझनमध्ये स्ट्राॅबेरी मिळू शकते. तोरणमाळच्या उंच ठिकाणाहून एकच रस्ता सात वेळा वळताना दिसतो. हा रस्ता पाय-यांप्रमाणेे दिसतो. त्यामुळे याला सात पाय-यांचा घाट असे संबोधले जाते. राणीपूर ते तोरणमाळ या घाटाचे अंतर २९ किमी एवढे आहे. ३८६ हून अधिक वनाैषधींची रोपे बोटनिकल गार्डनमध्ये पाहायला मिळतात.