आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे येथे परदेशी पर्यटक दुचाकी अपघातात जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे- भारतातील एका आध्यात्मिक पंथाशी प्रभावित होऊन भारतभेटीवर आलेला पोलंडमधील पर्यटक ज्युलिअस पॉवेल मोहाडीजवळ दुचाकी अपघातात जखमी झाला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. ज्युलिअसची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

वाराणसीहून धुळेमार्गे गोव्याला निघालेला ज्युलिअस पॉवेल अँपानिकस (56) हा मोटारसायकलने (युपी.6515/2395) प्रवास करत होता. लळिंगपासून जवळ असलेल्या टोल नाक्याजवळ लोखंडी बॅरिकेट्सला आदळून त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली. हा अपघात मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास झाला. त्यानंतर मोहाडी पोलिसांच्या मदतीने ज्युलिअसला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी सजिर्कल विभागात त्याच्यावर उपचार करण्यात आले. मोहाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी अरुण पाटील यांनी डॉक्टरांच्या मदतीने त्याचा जबाब नोंदविला. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्याला सुटी देण्यात आली. अपघातासंदर्भात मोहाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

बेल्जियमचा पर्यटक
सुमारे सहा वर्षांपूर्वी 2008मध्ये मालेगाव रोडवरील रेल्वे क्रॉसिंगजवळ बेल्जियम येथील तरुण पर्यटक बेशुद्धावस्थेत मिळून आला होता. कावीळमुळे आजारी असलेल्या या पर्यटकावर जिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला औरंगाबादला हलवण्यात आले होते. यानंतर तो सुखरूप मायदेशी परतला होता.