आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धेचा समाराेप, सांबरी’ एकांकिका ‘पुरुषाेत्तम’ची मानकरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘पुरुषोत्तम करंडक’ आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत जळगावच्या नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटीच्या ‘सांबरी’ या एकांकिकेला प्रथम सांघिक पारिताेषिक मिळाले, तर भुसावळच्या पी.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या ‘धागा’ या एकांकिकेला दुसरे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या ‘पाझर’ या एकांकिकेला तिसरे बक्षीस मिळाले.
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालयातील नाट्यशास्त्र विभाग आणि महाराष्ट्रीय कलोपासक पुणे यांच्यातर्फे आयोजित ‘पुरुषोत्तम करंडक’ एकांकिका स्पर्धेचा समारोप पारितोषिक वितरण समारंभ रविवारी भय्यासाहेब गंधे सभागृहात झाला. या वेळी प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रतीक्षा लोणकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे सदस्य हरीश मिलवाणी होते. रंगमंचावर केसीई व्यवस्थापन परिषदेचे सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट, शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी, उपप्राचार्य प्रा. नंदकुमार भारंबे, नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. हेमंत कुलकर्णी, महाराष्ट्रीय कलोपासकचे राजेंद्र नागरे, प्रा. चारुदत्त गोखले, परीक्षक पी.एन.कुलकर्णी, दिगंबर निघोजकर, रवींद्र सावंत उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. उदय कुलकर्णी यांनी केले. स्पर्धेचा आढावा प्रा. हेमंत पाटील यांनी घेतला. डॉ. भाग्यश्री भलवतकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. प्रसाद देसाई यांनी आभार मानले. ज्येष्ठ कलावंतांचा सत्कार करण्यात अाला.

यांना पारितोषिक :आयएमआर महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘रिव्हिल्ड’ या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे पारितोषिक देण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनय गणेश पाटील (धागा), सर्वोत्कृष्ट लेखक दर्शन गुजराथी (धागा), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्राची शर्मा (सांबरी), सर्वोत्कृष्ट वाचिक अभिनय आकाश शर्मा (सांबरी), स्त्री अभिनय नैपुण्य भूमिका पाटील (निष्फळ), पुरुष अभिनय नैपुण्य जगदीश जाधव (पाझर) यांना देण्यात आले.

दाेन दिवसांत १० एकांकिका सादर
दोन दिवस चाललेल्या स्पर्धेत तेरा एकांकिकांपैकी १० एकांकिका सादर झाल्या. यात तीन एकांकिका नियमांची पूर्तता केल्यामुळे बाद करण्यात आल्या. सादर करण्यात आलेल्या एकांकिकांमध्ये पहिल्या दिवशी “”पाझर’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद) ‘मुक्काम पोस्ट महाविद्यालय’ (शेठ मुरलीधर मानसिंगका महाविद्यालय, पाचोरा), ‘एकाकी’(जनसंवाद पत्रकारिता विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव), ‘धागा’ (पी.ओ.नाहाटा महाविद्यालय, भुसावळ), ‘रिव्हिल्ड’ (आय.एम.आर. महाविद्यालय, जळगाव), ‘ऐसाभी कभी कभी’ (स्त्री अभ्यास केंद्र उ.म.वि.), “”सांबरी’ (नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी), ‘निष्फळ’ (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) या एकांकिका सादर झाल्या. रविवारी ‘सुसाइड’ (डॉ. अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय) आणि “”टायटल’ स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड या एकांकिका सादर झाल्या.
मू.जे. महाविद्यालयातर्फे अायाेजित पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेतील नाहाटाच्या ‘धागा’ एकांकिकेला द्वितीय पारितोषिक मिळाले.
बातम्या आणखी आहेत...