आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यासाठी जळगाव आगारातून २५० बसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी जळगाव आगाराने तब्बल २५० बसेस आणि जवळपास ४० अधिकारी कर्मचारी उपलब्ध करून दिले आहेत. गर्दीच्या पहिल्या तीन पर्वणींमध्ये दविसाला २० ते २२ बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे.

सन २००३मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जळगाव आगाराने २०० बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. सिंहस्थ कुंभमेळ्याला जळगाव जिल्हा आणि परिसरातून लाखो भाविक हजेरी लावत असतात. कुंभमेळ्यामुळे आगाराला मोठे उत्पन्न िमळणार आहे. त्यासाठी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजन सुरू केले आहे. जळगाव शहरासह अन्य तालुक्यांतून कुंभमेळ्यास जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून २५० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुकानिहाय नियोजन केले जात आहे. बसेसच्या उपलब्धतेसह ३५ पर्यवेक्षक कर्मचारी, एक विभाग नियंत्रक, विभागीय अधिकारी, उपयंत्र अभियंता, आगार व्यवस्थापक असे ४० अधिकारी कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्वणींच्या दविसांत अधिक गर्दी होणार असल्याने या अधिकारी कर्मचाऱ्यांना सलग तीन दविस नियुक्ती दिली जाणार आहे.

कुंभमेळाव्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांना स्वतंत्र थांबे देण्यात आले आहेत. यात जळगावसाठी हॉटेल राऊ, शरदच्चंद्र पवार मार्केट तसेच आरटीओ कार्यालयाजवळ हे थांबे देण्यात आले आहे. कुंभमेळ्यातील तीन पर्वणींसाठी गेलेल्या बसेसचे नियोजन हे नाशिक विभाग नियंत्रकांच्या नियंत्रणाखाली केले जाणार आहे. जुलै महनि्यात तर ऑगस्ट महनि्यात अशा तीन महत्वपूर्ण पर्वणी असतील त्यामुळे हे दविस अधिक गर्दीचे मानले जाणार आहेत. दरम्यान, या दविसांत २५० बसेस रवाना होणार असल्याने आगाराचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. यासह यादरम्यान श्रावणमासही असल्याने जिल्हांतर्गत धार्मिक ठिकाणांवर जाणाऱ्या बसेसच्या फेऱ्यांवर परिणाम होणे शक्य आहे. यावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी फेऱ्यांचे पुनर्नियोजन केले जाणार असल्याचे आगाराच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक शहराबाहेर असेल थांबा
कुंभमेळ्यासाठीजाणाऱ्या जळगाव आगाराच्या बसेससाठी नाशिक शहराबाहेर वशिेष थांबा उपलब्ध करून दिला जाणार आहे. तेथून सिंहस्थाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी भाविकांना नाशिक आगाराच्या हिरव्या रंगाच्या खास बसेस उपलब्ध राहतील. यादरम्यान प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ठिकठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...