आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालवाहू रिक्षात टाकून दुचाकींची चोरी; शहरात टोळी सक्रिय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो...)
जळगाव- शहरात मालवाहू रिक्षात दुचाकी टाकून चोरी करण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अवलंबला आहे. मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या परिसरातून अशा पद्धतीने चोरटे दुचाकी लांबवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, हा प्रकार वेळीच दुचाकी मालकाच्या लक्षात आल्याने अन् त्यांनी चोरट्यांना हटकल्यामुळे चोरट्यांनी धूम ठोकली. दरम्यान, गेल्या दीड महिन्यात शहरातून १० मोटारसायकली लंपास झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
माेटारसायकलची चाेरी हाेऊ नये म्हणून हॅण्डल लाॅक लावले जाते. मात्र, चाेरट्यांनी त्यावरही नवीन शक्कल लढवली अाहे. ते अाता मालवाहू रिक्षात माेटारसायकल टाकून उचलून नेत अाहे. त्यामुळे अाजूबाजूच्यांना शंकाही येत नाही माेटारसायकलची चाेरीदेखील करता येते. मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास नीलेश पाटील (रा.डाेणगाव) हे विनाक्रमांकाची माेटारसायकल घेऊन तहसील कार्यालयात अाले हाेते. त्यांनी माेटारसायकल तहसील कार्यालयासमाेर असलेल्या गल्लीत लावून ते कामासाठी तहसील कार्यालयात गेले. काम संपवून परत येत असताना त्यांना काेणीतरी त्यांची माेटारसायकल उचलून मालवाहू रिक्षात टाकत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी अारडाअाेरड केल्याने चाेरट्यांनी माेटारसायकल तेथेच टाकून धूम ठाेकली. दुसऱ्या घटनेत मंगळवारी सकाळी वाजेच्या सुमारास महापालिकेचा राेजंदारी सफाई कामगार कन्हय्या प्रकाश लाेंढे (वय २९, रा.गेंदालाल मिल) हा साफसफाई करण्यासाठी शाहूनगरातील हाैसिंग साेसायटीत गेला हाेता. त्या वेळी त्याने त्याची माेटारसायकल (क्र.एमएच-१९-बीडी-११६६) दीपस्तंभ क्लासेसजवळ लावली हाेती. काम संपल्यानंतर सकाळी १० वाजता कन्हय्या माेटारसायकल घेण्यासाठी अाला. मात्र, त्या ठिकाणी माेटारसायकल नव्हती. याप्रकरणी त्याने शहर पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे. तसेच जानेवारी राेजी दुपारी १२ वाजता खान्देश सेंट्रल परिसरात अायाेजित महा अाराेग्य शिबिरासाठी अालेल्या राजेश साेनवणे (वय ३०. रा. सावखेडा, बुद्रूक) यांची माेटारसायकल (क्र.एमएच-१९-बीसी-९५४८) चाेरी झाली हाेती. १३ जानेवारी राेजी दुपारी ते वाजेच्या दरम्यान मुनीर शेख चाँद रंगरेज (वय २३. रा.चाेपडा) हे माेबाईल खरेदीसाठी गाेलाणी मार्केटमध्ये अाले हाेते. त्यावेळी त्यांची माेटारसायकल (क्र.एमएच-१९-बीएल-०१५२) ही चाेरी झाली हाेती. याप्रकरणी मंगळवारी शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला अाहे.

दीड महिन्यात शहरातून सर्वाधिक म्हणजे दहा माेटारसायकली चाेरी झाल्या आहेत. परंतु अद्यापही चोरट्यांची टोळी पोलिसांच्या हाती लागली नाही. डिसेंबरला शिव काॅलनीतून दगडू पाटील यांची एमएच-१९-एयू-७५६७ क्रमांकाची, डिसेंबरला प्रेमनगरातून सपकाळे यांची एमएच-१९-एजे-४००३ क्रमांकाची, १७ डिसेंबरला गाेलाणीमधून गाेविंद पाटील यांची एमएच-१९-बीएल-६८८७ क्रमांकाची, १७ डिसेंबरला विसनजीनगरातून संजय वाणी यांची एमएच-१९-सीए-४२२७ क्रमांकाची, ११ जानेवारीला अांबेडकर मार्केटमधून सुरेश जाेशी यांची एमएच-१९-बीपी-९४५१ क्रमांकाची, १३ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातून पंकज जैन यांची एमएच-१९-बीसी-४९०२ क्रमांकाची, १७ जानेवारीला खान्देश सेंट्रलमधून फहिम खान हसन खान यांची एमएच-१९-बीपी-७९०६ क्रमांकाची अाणि मंगळवारी शाहूनगरातून कन्हय्या लाेंढे यांची गाडी चाेरट्यांनी लंपास झाली अाहे. तर शहर पाेलिस ठाण्याला १३ जानेवारी माेटारसायकल चाेरीचे दाेन गुन्हे दाखल झाले अाहे.

बिग बझारच्या पार्किंगमध्ये कॅमेरे वाढवणार
बिगबझारच्या पार्किंगमधून माेटारसायकल चाेरी हाेण्याचे प्रमाण वाढलेले अाहे. त्यामुळे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या लवकरच वाढवण्यात येणार अाहे. सुटीच्या िदवशी जास्त गर्दी असल्यामुळे त्या वेळी अाम्ही सुरक्षारक्षकांची संख्या वाढवताे. साेमनाथ वाघमारे, सरव्यवस्थापक,बिग बझार

सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना दिल्या
बिग बझारच्या पार्किंगमध्ये तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना व्यवस्थापनाला दिल्या अाहेत. तसेच माेटारसायकलचाेरी राेखण्यासाठी डीबी पथकाला अादेश दिले अाहेत. नवलनाथतांबे, पाेलिसनिरीक्षक, शहर पाेलिस ठाणे
शहरातून चाेरलेल्या माेटारसायकलींची ग्रामीण भागात विक्री

२८ डिसेंबरला एकाला अटक
तालुक्यातील नांद्रा येथील विनाेद साेनवणे (वय २२) अाणि विनाेद साेनवणे (वय २३) यांना जिल्हापेठ पाेलिसांनी २८ डिसेंबरला अटक केली हाेती. त्यांनी गाेलाणी मार्केटच्या पार्किंगमधून हीराे पॅशन-प्राे माेटारसायकल (क्र.एमएच-१९-एबी-५६८८) चाेरली हाेती. चाेपडा तालुक्यात जगन बारेला या शेतात काम करणाऱ्या मजुराला त्याने १५ हजारांत ती विक्री केली हाेती. तसेच महिन्यांपूर्वी गाेलाणी मार्केटच्या पार्किंगमधून स्प्लेंडर (क्र.एमएच-१९-यू-८४८८) चाेरली हाेती. ती विनाेदच्या नातेवाइकाला विक्री केली हाेती. त्यामुळे शहरातून चाेरलेल्या माेटारसायकली ग्रामीण भागात विक्री हाेत असल्याचे उघड झाले अाहे.