आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यापाऱ्यांवर हल्ला करून अडीच लाख रुपये लुटले, धुळ्यातील थरारक घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - देवपुरातील नगावबारी परिसरात असलेल्या कल्याणी बंगल्यामागे दबा धरून बसलेल्या सहा जणांनी व्यापाऱ्यावर काठीने हल्ला करीत त्यांच्याकडील अडीच लाख रुपये असलेली बॅग हिसकावून लूट केली. मंगळवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी देवपूर पाेलिसांत गुन्हा दाखल करण्यात अालाे. या हल्ल्यात व्यापाऱ्याला दुखापत झाली.

किराणा अाणि खासगी प्रवासी वाहतूक कंपनी चालवणारे कमलकांत सत्यप्रकाश गुप्ता (वय ५४) यांचे नगावबारी परिसरातील िशवाजीनगरात निवासस्थान अाहे. मंगळवारी रात्री किराणा दुकान बंद करून ते िदवसभराच्या व्यवहाराचे पैसे अाणि उधारीच्या डायऱ्या घेऊन माेटारसायकलने घरी जात हाेते. नगावबारी परिसरातील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या कल्याणी बंगल्याकडून िशवाजीनगरात जाणाऱ्या रस्त्यावर त्यांनी वळण घेतले. त्या वेळी तिथे अगाेदरपासून दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी गुप्ता यांच्यावर काठी व दगडाने हल्ला केला. अचानक झालेल्या प्रकाराने ते गाेंधळून गेले. तसेच दुचाकीचे नियंत्रण सुटून ते खाली पडले. या वेळी पाच ते सहा जणांनी त्यांच्या हातात असलेली काळ्या रंगाची बॅग हिसकावून याच रस्त्यावर लावलेल्या दाेन माेटारसायकलींवर बसून नगावबारीमार्गे पळ काढला. या बॅगेत राेख २ लाख ३५ हजार रुपये अाणि ग्राहकांच्या उधारीच्या डायऱ्या, इतर कागदपत्रे हाेती. रात्रीची वेळ असल्याने या परिसरात शुकशुकाट हाेता. मात्र महामार्गावर वाहनांची ये-जा सुरू हाेती. लुटारूंनी अचानक केलेल्या हल्ल्यात काठी त्यांच्या डाेक्यावर लागून दुखापत झाली तर डाव्या खांद्याखाली दगड लागल्याने त्या ठिकाणीही दुखापत झाली. त्यांनी घटनेनंतर काही अंतरावर असलेल्या घरी जाऊन गुप्ता पाेलिसांना कळविले. त्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने त्यांना काहीही हाती लागले नाही. तसेच लुटारू हे नगावबारीकडून पसार झाल्याने याबाबत साेनगीर पाेलिसांना कळवून नाकाबंदी केली. मात्र, चाेरटे महामार्गावरील फाट्यावरून अाड रस्त्याने पसार झाल्याने नाकाबंदीत अशी काेणतीही व्यक्ती अाढळून अाली नाही.
माहितगारांकडूनच कट ?
घटनास्थळी पाेलिसांनी पाहणी केली असता तिथे एक लहान नाला दिसून अाला. तिथे फरशी तयार केली अाहे. तसेच काटेरी झाडेही अाहेत. त्याअाड लुटारू उभे हाेते. परिसरातील काही जणांनी त्यांना उभे असल्याचे पाहिले. मात्र, काेणीतरी गप्पा मारत असेल, म्हणून काेणाला संशय अाला नाही. संबंधित अाराेपी हे माहीतगार असावे, अशी शक्यता पाेलिसांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...