आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळे लिलावाविरुद्ध व्यापाऱ्यांची भाजप आमदाराच्या घरी धडक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राज्य शासनाच्या अादेशानंतर मनपाने १४ व्यापारी संकुलातील गाळ्यांचा लिलावाचा ठराव महासभेत पारित केला. परंतु अाता गाळेधारकांनी त्यालाही विराेध सुरू केला अाहे. अामदार डाॅ. गुरूमुख जगवानी यांच्या बंगल्यावर धडक मारत शासनाकडून लिलावाचा निर्णय रद्द करून अाणण्याची मागणी करण्यात अाली. त्यावर अामदार जगवानींसह सुरेश भाेळे यांनी पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चेनंतर मार्ग काढण्याचे अाश्वासन देत दबाव निर्माण करण्यासाठी माेर्चा काढण्याचे बंद पाळण्याचा सल्ला दिला. अापलेच सरकार असताना दाेघा अामदारांच्या या भूमिकेबद्दल गाळेधारकच अाश्चर्य व्यक्त करीत अाहेत.
मनपाच्या बुधवारी झालेल्या महासभेत शासनाच्या अादेशानुसार कलम ७९ प्रमाणे १४ मार्केटमधील गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव केला हाेता. त्यानंतर या मार्केटमधील गाळेधारकांमध्ये संतापाची लाट पसरली अाहे. एकीकडे चार मार्केटसंदर्भात शासन वेगळी भूमिका घेते अाणि दुसरीकडे १४ मार्केटचा निर्णय कलम ७९ प्रमाणे घेण्याचे अादेश देते. या परस्पर विराेधी भूमिकेमुळे जाब विचारण्यासाठी सुमारे १०० ते १५० व्यापारी शनिवारी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास अामदार डाॅ. गुरुमुख जगवानी यांच्या बंगल्यावर पाेहाेचले. या वेळी डाॅ. शांताराम साेनवणे, तेजस देपुरा, सुरेश पाटील, दिलीप दहाड, राजेश काेतवाल यांच्यासह अनेकांनी अापली नाराजी परखड शब्दात व्यक्त केली. शासनाने सर्वांना एकच न्याय द्यावा. शहरातील कानाकाेपऱ्यात असलेल्या लहान मार्केटमधून मनपा लाखाे रुपयांची अवाजवी वसुली करू पाहत अाहे. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या तसेच मनपाचे सर्व कर भाडे वेळीच भरणाऱ्या गाळेधारकांच्या गाळ्यांचा लिलाव करून त्यांना देशाेधडीला लावून रस्त्यावर अाणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा अाराेप केला. गाळ्यांची किंमत या ठरावामुळे पाचपट नव्हे तर ३०० पट वाढणार अाहे. गाळ्याची किंमत लाख रुपये असताना मनपाने त्याचे भाडे लाख अाकारण्याची नाेटीस बजावणे कितपत याेग्य अाहे, असेही मत व्यक्त केले.
अाम्ही तुमच्या साेबतच : यावेळी उशिरा अालेल्या अामदार भाेळेंना ‘मामा तुम्ही फाेनही घ्यायला तयार नाहीत,’ असा टाेलाही व्यापाऱ्यांनी लगावला. त्यावर भाेळे यांनी खाविअावर अाराेपांच्या फैरी झाडल्या. पाच लाख लाेकांच्या हिताचा कांगावा केला जात अाहे. यात दुकानदारांचा काय दाेष अाहे. लिलाव करणे हाच एक मार्ग अाहे का? तुम्ही अांदाेलन करा, शेवटपर्यंत तुमच्या साेबत राहू. पालकमंत्री खडसेंशी यासंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्याचे अाश्वासन दिले.
...पाेलिसांची पहिली लाठी मी खाईल
पालकमंत्रीखडसेयांच्याशी चर्चेनंतर मार्ग काढणार. तुम्ही माेर्चा काढा. वेळ पडल्यास मी पाेलिसांची पहिली लाठी खाण्यास तयार अाहे. तुम्हाला न्याय मिळवून देणार. डाॅ. गुरुमुख जगवानी, अामदार
लिलाव योग्य नाही, भूखंड विक्रीला काढा
सत्ताधाऱ्यांनीकेलेल्याकर्जफेडीसाठी गाळ्यांचा लिलाव करणे याेग्य नाही. त्याएेवजी ख्वाजामिखॉं, नगरपालिका साने गुरुजी रुग्णालयाच्या जागेचा भूखंड विक्रीला काढा, त्यातून काेट्यवधी रुपये मिळतील. - सुरेश भाेळे, अामदार
नूतन मराठात व्यापाऱ्यांची अाज बैठक
लिलावाच्या विराेधात अागामी काळात काय करायचे यासंदर्भात व्यापाऱ्यांची रविवारी सकाळी ११ वाजता नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक हाेणार अाहे. या वेळी उपस्थित राहण्याचे काेअर कमिटीचे अध्यक्ष डाॅ. शांताराम साेनवणे यांनी कळवले अाहे.
शनिवारी सकाळीच व्यापारी आमदार जगवानींच्या घरी धडकले. आमदार सुरेश भोळेही
सत्ताधारी अामदारांना माेर्चा काढण्याची गरज काय?
मनपाच्या १८ मार्केटपैकी केवळ मार्केटसंदर्भात वेगळा न्याय अन् १४ मार्केटसंदर्भात वेगळा न्याय शासनाने का घेतला? लिलावाचा निर्णय हा शासनाच्या अादेशामुळेच घ्यावा लागला अाहे. मनपाचे मार्केटमधून जे काही अार्थिक उत्पन्न असेल ते शासनाने द्यावे गाळ्यांचा काहीही निर्णय घ्यावा. भाजपला खरंच इतकी काळजी हाेती तर त्यांनी ठराव करताना महासभेत भूमिका का व्यक्त केली नाही. राज्यात भाजपची सत्ता असताना माेर्चा काढणे बंद पाळण्याचा सल्ला देण्याची अामदारांना का गरज भासते? त्यांनी थेट शासनाकडून निर्णय अाणावा, असे उपमहापाैर सुनील महाजन यांनी सांगितले.
छायाचित्र: जगवानींच्या घरी आल्यानंतर व्यापाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करताना.