आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Traders Of Income Tax Department To Check In Jalgaon

जळगावात व्यापा-यांची आयकरकडून तपासणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावातील बांधकाम, टाइल्स व्यावसायिकांची गुरुवारी आयकर विभागाकडून तपासणी करण्यात अाली. एकाच वेळी शहरातील आठ व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांमध्ये दिवसभर तपासणी चालली.
पुणे, नाशिक आणि धुळे येथून आयकर विभागाचे पथक तपासणीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजता जळगावात दाखल झाले. त्यांनी एकापाठाेपाठ एक शहरातील आठ प्रतिष्ठानांवर जाऊन तपासणी केली. त्यात बांधकाम व्यावसायिक सुमीत मुथा यांचे मुथा सिरॅमिक, वर्धमान भंडारी यांचे भंडारी कन्ट्रक्शन, राहुल कोटेचा यांचे अरिहंतम इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, विजय लोढा यांचे दीप टाइल्स, देशपांडे मार्केटमधील लॅण्ड डेव्हलपर जे.के.महाजन यांचे कार्यालय, बी.जे.मार्केटमधील रमेश लोचनानी यांचे आकाश प्लायवूड, राजस्थान मार्बल आणि भगवती टाइल्स या आठ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी सुरू होती, तर काही दुकानांची तपासणी पूर्ण झाल्यामुळे शुक्रवारी आयकर विभागाचे अधिकारी तपासणी करणार अाहे. धुळे, नािशक, पुणे येथून आलेल्या पथकास जळगावच्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. दरम्यान, या तपासणीसंदर्भात बाेलण्यास अायकर विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी नकार दिला.