आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Traditional Festivals,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भुलाबाईच्या गाण्यांतून पर्यावरणाचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सासूगेली समजावयाला, चला चला सुनबाई आपुल्या घराला सोलर कुकर देते तुम्हाला, दीर गेले समजावयाला चला चला वहिनीसाहेब आपुल्या घराला सोलर दिवे देतो तुम्हाला, पती गेले समजावयाला चला चला राणीसाहेब आपुल्या घराला झाडे लावून देतो तुम्हाला’ असे म्हणताच नवरी घरी येण्याला राजी होते आपल्या सासरी जाते. त्यामुळे पारंपरिकतेचे महत्त्व जपत, पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश देत इको फ्रेंडली भुलाबाई महोत्सव रविवारी साजरा करण्यात आला.
केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे या ‘भुलाबाई महोत्सवाचे’ आयोजन खान्देश सेंट्रलच्या हॉलमध्ये करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मधू जैन, ममता राठी तसेच केशवस्मृतीच्या शोभा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महोत्सव प्रमुख डॉ. मंजूषा पवनीकर यांनी केले. ही स्पर्धा ते 10 वर्षे, 10 ते 16 वर्षे 16 वर्षांपुढील खुला गट अशा तीन गटात घेण्यात आली. बक्षीस वितरणाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ममता कांकरिया होत्या. याचे परीक्षण लहान गट नेहा जोशी, वैदेही नाखरे, भारती दक्षिणकर, मोठा गट वैशाली गोरे, पद्मजा नेवे, अपर्णा चौधरी खुल्या गटाचे परीक्षण डॉ. जयंती चौधरी, रंजन शहा,अंजली हांडे यांनी केले. शुभदा नेवे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी साधना राजे, अपर्णा महाशब्दे, अनिता वाणी, श्रद्धा कुळकर्णी, स्वप्ना कुळकर्णी, संगीता अट्रावलकर, मनीषा खडके, स्मिता पिले, प्रांजली रस्से, संगीता शहा, प्रीती झारे यांनी तसेच प्रमाणपत्रांसाठी नितीन नेमाडे यांनी सहकार्य केले. भुलाबाई महोत्सवात खेळ सादर करताना महाराणा प्रताप शाळेतील विद्यार्थिनी.
पारंपरिक वेशभूषा
यावेळी लहान मुलींनी नऊवारी पातळ नेसून आकर्षक नृत्ये सादर केली. तसेच घागरी फुंकणे, फुगड्यांचे विविध प्रकारात बैठी तसेच एका हाताची फुगडी खेळणे, फेर धरणे, झिम्मा खेळणे यासारखे खेळ यात करण्यात आले. भुलाबाईच्या गाण्यांचे नाट्यमय सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात आले.
भुलाबाई म्हटले की, भुलोजी आणि भुलाबाई यांच्यातील रंजक कथेची गाणी गात,आनंद साजरा करणे असे स्वरूप असते . यातील एक महत्त्वाची परंपरा म्हणजे खाऊ ओळखणे, मुली एकमेकींच्या घरी जाऊन गाणी म्हणतात आणि मग खाऊ ओळखला जातो. माझा खाऊ ओळखलाच जाऊ नये आणि मी जिंकावे या उद्देशाने प्रत्येक मुलगी दरवेळी वेगवेगळा खाऊ ठेवण्याची धडपड करीत असते आणि खाऊमुळेच मुलांचाही यात नकळत सहभाग होत असतो. या मजेशीर, खोडकर प्रेमाने भरलेल्या खाऊ ओळखण्याच्या प्रकाराचे ‘शिंक्यावरचे लोणी खाल्ले कुणी, खाल्ले कुणी’ या गाण्यातून वर्णन करण्यात आले. याचबरोबर जल प्रदूषणाचा संदेश देत, शाळकरी मुलींनी चक्र उडी, सुपारी, कमळ बनवणे, चित्र काढणे यासारख्या कलाकृती सादर केल्या.