आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानंदुरबार - आदिवासी समाजात होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातही काठीच्या होळीला या समाजात मोठे स्थान आहे. आदिवासी बांधव होळीसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पाड्यांवर उत्साहाचे वातावरण आहे, मात्र बाजारपेठेतील मंदी या उत्साहावर परिणाम करू शकते.
काठीच्या होळीला आदिवासी समाजात मोठे स्थान आहे. या होळीला राजवाडी होळी असे संबोधले जाते. आजही हा पारंपरिक उत्सव टिकून आहे.
या काळात ढोलाचा आवाज सातपुड्याच्या कानाकोप-यात निनादतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करण्यात येते. या काळात सर्व अनवाणी फिरतात. महिला चांदीचे दागिने परिधान करतात. अक्कलकुवा व धडगावच्या मधोमध असलेल्या काठीच्या होळीचे वर्णन शब्दांत करणे कठीणच. आकर्षक वेशभूषा करून सर्व जण 35 फूट लांबीचा बांबू खांद्यावर नेऊन होळीसाठी केलेल्या खड्ड्यात उभा करतात. हा खड्डा हातानेच तयार केला जातो. काठीच्या होळी उत्सवाला लाख ते दीड लाख आदिवासी बांधव उपस्थित असतात. हा उत्सव पाहण्यासाठी थेट मुंबई, दिल्लीचे नागरिक येतात.
चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीही या ठिकाणी हजेरी लावली होती.ढोलाच्या तालावर रात्रभर साजरी होते होळी हा उत्सव सायंकाळी सुरू होऊन सूर्योदयापर्यंत चालतो. जंगलातून आणलेली लाकडे, गोव-या बांबूभोवती रचतात. सूर्योदयापूर्वी होळी पेटवतात.
होळीच्या आधी येणारा हा विशेष बाजार. 10 ते 12 पाड्यांपैकी एका मध्यवर्ती गावात हा बाजार सर्वानुमते भरवतात. प्रत्येक पाड्याचे मुखिया एकत्र येऊन बाजाराचा दिवस ठरवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.