जळगाव- अतिक्रमणमुळे अजिंठा चौफुलीवर वाहतुकीचा खोळंबा होण्याचे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढून चौफुलीचे सुशोभिकरण करण्यात यावे, यासाठी ‘दिव्य मराठी’ने अभियान सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाईदेखील सुरू केली होती. गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे अजिंठा चौफुलीवरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.
महामार्गावर ठिकठिकाणी दुतर्फा रिक्षा, ट्रक, ट्रॅव्हल्स उभ्या राहत असल्याने अपघाताचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच चौफुली ते कालिंकामाता मंदिरापर्यंत पाऊण किलोमीटरच्या महामार्गावर रिक्षा, ट्रक दुरुस्तीचे गॅरेज आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त वाहने उभी असतात. यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने अभियान सुरू केले होते. त्यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास चौफुलीच्या सुशोभिकरणासाठी पुढाकार घेतला होता. ऑक्टोबर रोजीदेखील अतिक्रमणा विषयी वृत्त प्रकाशित करून पोलिसांचे लक्ष वेधले होते. त्यानुसार गुरुवारपासून आता या मार्गावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली आहे.
कारवाई सुरूच राहणार
शहरातीलबेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे आता अजिंठा चौकात अतिक्रमणाविराेधात कारवाई सुरूच राहणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल. चंद्रकांतसरोदे, पोलिसनिरीक्षक, शहर वाहतूक शाखा
महापालिकेची घेतली जाते मदत अतिक्रमणकाढण्यासाठी मनपाचीही मदत घेतली जात आहे. पालिकेने जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले होते. त्याच्या मदतीने दुकानदारांनी तात्पुरत्या स्वरुपात तयार केलेले सिमेंट काँक्रिटचे ओटे तोडण्यात आले.
वाहतूक पोलिसांची क्रेन सज्ज
अजिंठाचौफुलीसह शहरातून जाणा-या संपूर्ण महामार्गालगत रिक्षा आणि ट्रक उभ्या केल्या जात आहेत. पोलिसांनी अजिंठा चौफुलीवरील ट्रक आणि रिक्षांना हटवले आहे. गॅरेज किंवा ट्रान्सपोर्टसमोर एकच वाहन उभे ठेवण्याची तंबी दिली आहे. यानंतर असे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी कळवले आहे.