आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेरी वाहतुकीद्वारे सोडवणार कोंडीची समस्या : डॉ.सुपेकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला असून ही समस्या सोडवण्यासाठी बसस्थानक परिसरात एकेरी वाहतूक सुरू केली जाणार आहे. यासंदर्भात नव्याने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना सहायक पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत. या प्रस्तावानंतर वाहतुकीत बदल केला जाईल, सम-विषम तारखेची पार्किंग आणि सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी दिली. 
 
साेमवारी दुपारी डीवायएसपी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाजारपेठ पाेलिस ठाणे अाणि डीवायएसपी कार्यालयाच्या वार्षिक तपासणीसाठी डाॅ. सुपेकर सोमवारी भुसावळात अाले हाेते. तपासणी झाल्यानंतर बाजारपेठ पाेलिस ठाण्यात अधीक्षकांनी पोलिस दरबार घेतला. पोलिसांच्या समस्या या माध्यमातून त्यांनी जाणून घेतल्या. सहायक पाेलिस निरीक्षक मनाेज पवार, सहायक फाैजदार प्रकाश बरडे, उपनिरीक्षक अाशिष शेळके, माेहंमद अली सय्यद, नीलेश बाविस्कर यांनी समस्या मांडल्या. बाजारपेठला एक अतिरिक्त वाहन आणि पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अॅक्वागार्ड देण्याची घोषणा अधीक्षकांनी केली.
 
Áचाैक्या सुरूठेवा : बाजारपेठशहर पाेलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या पाेलिस चाैक्या तत्काळ सुरू केल्या करा, अशा सूचना डाॅ. सुपेकर यांनी सहायक पाेलिस अधीक्षक नीलाेत्पल यांना दिल्या. संबंधित बीटचे पाेलिस कर्मचारी त्याच चाैकीतच कामकाज पाहतील, असे त्यांनी सांगितले. 

Áकर्मचारी वाढवून देणार : पाेलिसकर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. अाठवडाभरात शहर पाेलिस ठाणे, वाहतूक शाखा, बाजारपेठ पाेलिस ठाण्यात वाढीव पोलिस कर्मचारी दिले जाणार आहेत. त्यामुळे रात्रीच्या गस्तीसाठी वाढीव पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती शक्य होईल. 
नव्या डीवायएसपी कार्यालयाची पाहणी करताना डॉ.जालिंदर सुपेकर 

दप्तर तपासणी पूर्ण 
डीवायएसपी कार्यालय आणि बाजारपेठ पोलिस ठाण्यात डॉ. सुपेकर यांनी दप्तर तपासणी केली. दाेन्ही ठिकाणचे काम समाधानकारक अाहे, असा शेरा त्यांनी मारला. शहरातील खुनाच्या घटना कमी झाल्या असून चाेरीचे प्रकार वाढले अाहेत. वर्षभरात १६ जबरी चाेऱ्यांची नाेंद विभागात झाली असून त्यातील १३ गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाला आहे. तपासासाठी एक पथक खंडवा येथे गेले अाहे. खंडवा पोलिसांनी काही संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून जिल्ह्यातील काही गुन्ह्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असे अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 
 
दाेन्ही इमारतींचे बांधकाम सध्या अंतिम टप्प्यात अाहे. एप्रिल महिन्यात नवीन इमारत पाेलिस प्रशासनाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. नवीन इमारतीत डीवायएसपी कार्यालय, पाेलिस कंट्राेल रूम, तालुका पाेलिस ठाणे अाणि पाेलिस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारली जातील. लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इमारत उभारणीसाठी ११ महिन्यांचा बांधकामाचा करार झाला आहे. या मुदतीत बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. नवीन इमारतीच्या बांधकामाचा पोलिस अधीक्षक डॉ. सुपेकर यांनी आढावा घेतला. आवश्यक बदलांबाबत त्यांनी संबंधितांना सूचना केल्या.