आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिककरांचा कोंडला श्वास; हार्ट ऑफ सिटी, अपघातांची भीती..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- चौफेर भरपूर जागा असतानाही केवळ रिक्षांची बेशिस्ती, अनधिकृत थांबे आणि अतिक्रमणांमुळे शालिमार चौक म्हणजे शहराचा मुकूट अर्थात ‘शालिमार’ नसून येथे केवळ वाहतुकीचा भार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राजकीय वरदहस्तामुळे या समस्येला खतपाणी घातले जात असताना, येथील बेटाची अवकळा दूर करण्याचे भानही महापालिकेला राहिलेले नाही. परिणामी नाशिककरांना जीव मुठीत घेऊनच येथून मार्गक्रमण करावे लागत आहे.

शहरातील मध्यवर्ती भागातील चौकांचे सुशोभीकरण व्हावे व वाहतुकीलाही शिस्त लागावी, या उद्देशाने वाहतूक बेट निर्माण असले तरीही आता त्याकडे दुर्लक्षच अधिक होत आहे. शालिमार चौकात तर रिक्षा आणि मोठय़ा वाहनांमुळे नागरिकांना कसे चालावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. बेटाच्या भोवती वाहने आणि हातगाड्यांचा वेढा असून रविवार कारंजाप्रमाणेच बसचालकांना येथे तारेवरची कसरत करावी.

नाशिक शहर आणि नाशिकरोडला जोडणार्‍या या चौकातून दिवसभरातून किमान 500 बसेसच्या 2 फेर्‍या गृहीत धरल्या तरीही किमान हजार बसेसची ये-जा सुरू असते. नाशिकरोडकडून येणार्‍या भगूर, देवळाली कॅम्प, तसेच सिन्नर मार्गावरील बसेस सीबीएसकडे जाण्यासाठी याच चौकातून पुढे जातात. त्याशिवाय निमाणी बसस्थानकातून नाशिकरोडला जाणारी प्रत्येक बस येथूनच जात असते. प्रमुख रस्त्याबरोबर या चौकातून एक रस्ता टिळकपथाकडे म्हणजेच प.सा. नाट्यगृहाकडून महात्मा गांधीरोड व रेडक्रॉसकडे जातो, तर एक रस्ता आंबेडकर पुतळ्याकडून सीबीएस व तिसरा रस्ता एकेरीमार्गाने मेनरोडकडे जातो. त्यामुळे या चौकात प्रचंड वर्दळ असते. त्यात रिक्षा, काळी-पिवळी वाहने व अतिक्रमणांची भर पडलेली असते.

शिस्त लावली पाहिजे
रस्त्याच्या दोन्ही बाजूस रिक्षा उभ्या राहत असल्याने बसेसला त्यांच्यामधून जावे लागते. बसथांब्यावर रिक्षांचे अतिक्रमण झाले आहे. हे सुरळीत करायचे असेल तर सर्वप्रथम रिक्षांना शिस्त लावली पाहिजे. -आदिल सिद्दीकी, नागरिक

पोलिसांची संख्या वाढवा
शालिमार चौकात नियमित तीन, चार वाहतूक पोलिस नियुक्त केले पाहिजे. पोलिस असल्यास रिक्षाचालक व दुचाकीस्वार नियम मोडत नाहीत. रिक्षाचालकांना शिस्त लावल्यास वाहतूक सुरळीत होईल.
-भगवान पुरे

दुतर्फा रिक्षांचे थांबे
या चौकात सर्वत्र रिक्षाच उभ्या राहत असल्याने बसमधील प्रवाशांची गैरसोय होते. बसेस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात. या रिक्ष वाहतूक बेटाला लागूनच उभ्या राहत असल्याने कोंडी होते. रिक्षाला बसचा थोडाही धक्का लागला तरी रिक्षाचालक वाद घालतात. बसचालकास मारहाणही होते. बेशिस्त रिक्षाचालकांवर कठोर कारवाई करावी.
-नितीन जगताप, एसटीकामगार सेना