आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडावरील सापामुळे सव्वा तास वाहतूक ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सापाला ताब्यात घेताना सर्पमित्र. - Divya Marathi
सापाला ताब्यात घेताना सर्पमित्र.
जळगाव- स्वातंत्र्य चाैकात सोमवारी सकाळी ८.४५ वाजता एका झाडावर धामण जातीचा साप अाढळून अाला. या सापाला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्यामुळे सव्वा तास वाहतूक ठप्प झाली होती. या वेळी दुचाकी एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या. सहा पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
 
तीन सर्पमित्रांनी पकडला साप
वन्यजीवसंरक्षण संस्थेचे अध्यक्ष वासुदेव वाढे, योगेश गालफाडे सुरेश साळुंके यांनी सापाला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. साळुंके यांनी झाडावर चढून फांदी हलवून सापाला जमिनीवर पाडले. त्यानंतर गालफाडे वाढे यांनी सुरक्षितपणे साप ताब्यात घेतला. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...