आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतुकीला अडथळा ठरणारे वाहनधारक पोलिसांच्या रडारवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रस्त्याच्या मधोमध चारचाकी वाहने उभी करून शेखी मिरविणार्‍या वाहनांबाबत मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने छायाचित्र प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक शाखेने आरटीओ विभागाला पत्र देऊन दोन्ही वाहनाच्या मालकांची माहिती मागवली आहे.

सोमवारी नूतन मराठा महाविद्यालयाजवळील रस्त्यावर अगदी मधोमध एमएच 19 एएक्स 333 क्रमांकाची टाटा मांझा कार उभी करून ठेवली होती. बराच वेळ होऊनही कार कडेला हलविण्यास चालक तयार नव्हता. या मार्गावरून जाणारे वाहतूक पोलिस देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत होते. तशीच एक एमएच 19एएच 0099 क्रमांकाची स्कार्पिओ जिल्हा परिषदेजवळ भररस्त्यात उभी होती. बराच वेळ ही गाडी तिथेच उभी होती. तरीही वाहतूक पोलिस काहीही कारवाई करण्यास तयार नव्हते. याप्रकाराबाबत मंगळवारी याबाबतचे छायाचित्र ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध होताच वाहतूक पोलिस खळबळून जागे झाले. वाहतूक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांनी आरटीओ विभागाला पत्र पाठविले असून या दोन्हीही गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत.

अल्पवयीन वाहनधारकांविरुद्ध उद्यापासून कारवाई
अल्पवयीन वाहनधारकांना परवाना नसताना वाहन चालविणे या विरोधी कारवाईची मोहीम वाहतूक शाखेने हाती घेतली आहे. गुरुवारपासून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. अल्पवयीन वाहनचालकांवर व त्यांच्या पालकांवर केसेस करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पालकांनी अल्पवयीन पाल्यांना वाहने देऊ नयेत, असे वाहतुक पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले यांनी कळविले आहे.