आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात भररस्त्यात वाहतूक पोलिसाच्या कानशिलात लगावली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शिवाजीनगर पुलाजवळ वाहतूक शाखेच्या पोलिसाने ट्रिपल सीट येत असलेल्या मोटारसायकलस्वारांना अडविले. त्यात झालेल्या हमरीतुमरीतून मोटारसायकलस्वाराने थेट भररस्त्यात पोलिसाच्या कानशिलात लगावल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. पोलिसांचा धाक संपल्याचे निदर्शनास आले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

शिवाजीनगर रेल्वे पुलावर नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी वाहतूक शाखेचे कर्मचारी वासुदेव पाटील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत होते. यावेळी शिवाजीनगर भागाकडून मनोज बेताणे, अशोक सोनवणे, मनोज पवार हे मोटारसायकलने ट्रिपल सीट येत असताना वाहतूक पोलिस कर्मचारी पाटील यांनी गाडी अडवली. गाडी अडविल्यानंतर वाहतूक पोलिसाने त्यांच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. मात्र, वाहनधारकाने परवाना न दाखविता उलट वाहतूक पोलिसालाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे काही वेळ वाहतूक पोलिस व वाहनधारकामध्ये बाचाबाची सुरू होती. त्यात वाहनधारकाने पोलिसाच्या कानशिलात लगावली. ही घटना शेजारीच कर्तव्य बजावत असलेल्या दुसर्‍या एका पोलिस कर्मचार्‍याने बघितल्यानंतर त्याने हस्तक्षेप करीत भांडण सोडवून त्या तिघांना ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात आणले. शहर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर ही घटना इतर वाहतूक पोलिसांना समजल्यामुळे ते देखील त्या ठिकाणी दाखल झाले. या प्रकरणी वाहतूक कर्मचारी पाटील यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तिघेही गेंदालाल मिल भागातील रहिवासी आहेत.