आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पीजे’ रुळावरून घसरली- जीवितहानी टळली; सांगवीजवळील पुलावर घडली घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहूर- पाचोरा-जामनेर(पीजे) रेल्वे शनिवारी सायंकाळी सांगवी गावाजवळील पुलावर रुळाखाली घसरली. सुदैवाने कोणालाच इजा झाली नाही. पुलावर गाडी थांबल्याने सुमारे दोनशे प्रवासी अडकले हाेते. रात्री १० वाजेपर्यंत अग्निशमन बंबाच्या साहाय्याने प्रवाशांना काढण्याचे काम करण्यात अाले.

शनिवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास पीजे रेल्वे पहूर येथून पाचोऱ्याकडे जात असताना सांगवी गावाजवळील गोगडी नदी पुलाजवळ अचानक रेल्वे इंजीनला काहीतरी वस्तू लागल्याने इंजिनाला धक्का बसून, पहिला डबा रुळावरून घसरला. त्यानंतर डब्याचे कपलिंग तुटल्यामुळे इतर डबे पुलावर राहिले. ऐन पुलावर अपघात झाल्याने दोन डब्यांमध्ये सुमारे २०० प्रवासी अडकून पडले. प्रवाशांमध्ये महिलांसह लहान मुलांचा समावेश हाेता. अपघात घडल्यानंतर अडकलेल्या प्रवाशांनी प्रचंड अाक्राेश केला. सगळेजण भांबावलेले हाेते.

अग्निशमनबंबाच्या साहाय्याने काढले
यावेळी पहूर, सांगवी येथील ग्रामस्थांनी प्रवाशांना काढण्यासाठी दोराच्या साहायाने प्रयत्न केला; परंतु ते शक्य होत नव्हते. त्यानंतर जामनेर पाचोरा येथील अग्निशमन बंबाच्या साहायाने प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम रात्री १० वाजेपर्यंत सुरू होते. जामनेर अागाराच्या बसने रेल्वे प्रवाशांना इच्छितस्थळी पाेहचवले. या वेळी जळगावचे प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे, पाचोरा भागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश गावित रेल्वेचे अधिकारी तळ ठोकून होते. या वेळी रेल्वेची भुसावळ येथील टीम तसेच रेल्वे पोलिसांचे एक प्लाटून सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.

तासाभराने उतरवले
मी जामनेर येथून शेंदुर्णी जाण्यासाठी रेल्वेत बसलो होतो. अचानक जोरदार आवाज झाला. गाडीला जोरदार झटका बसल्याने प्रवासी घाबरले होते. बोगीत लहान मुले, महिला रडत होत्या. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. एका तासानंतर अग्निशमन बंबाच्या साहाय्याने आम्हाला खाली उतरवले. विजय नामदेव आहेर, शेंदुर्णी

अाशाच साेडली हाेती
^आम्हीपहूरयेथून पाचोरा जाण्यासाठी रेल्वेत बसलो होतो. अचानक गाडी सांगवी गावाजवळ येताच, जोरदार आवाज झाला. आम्ही खूप घाबरलो होतो. गाडी थांबल्यावर दरवाजात येऊन पाहते, तर गाडी पुलावर उभी होती. त्यामुळे अाशाच साेडली हाेती. कमल शिवाजी पाटील, पाचोरा.

इंजिनाला धक्का बसला
पाचाेरा-जामनेररेल्वेरूळ दुरुस्तीचे काम सुरू हाेते. यामुळे गाडी अाली तेव्हा रूळ दुरस्तीचे सामान रेल्वे रुळावर राहिले असेल. इंजिनाला धक्का बसून, पहिला डबा रुळावरून घसरला. त्यानंतर त्या डब्याचे कपलिंग तुटल्यामुळे इतर डबे पुलावर राहिले. चंद्रमाेहन मिस्त्र, अायुक्त,रेल्वे सुरक्षा बल, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...