आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रद्द गाड्यांची रेल्वेकडून सर्रास तिकीट िवक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- इटारसी येथे रेल्वेच्या कॅबिनमधील रिलेला आग लागल्यामुळे तसेच मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. परिणामी दररोज अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. तरीदेखील गाड्याच्या तिकिटाची जळगाव रेल्वे स्थानकावरून सर्रास विक्री हाेत अाहे. शुक्रवारी राजेश हटकर यांना तिकीट घरात भुसावळ येथून सुटणारी पण रद्द झालेल्या कटनी पॅसेंजरचे नेपानगरचे तिकीट देण्यात अाले. त्यामुळे त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या अधिकाऱ्याने त्यांना रद्द झालेल्या गाडीच्या ितकिटाचे पैसे देता उपदेशाचे डाेस पाजले. तर दुसरीकडे स्टेशन मास्तरांनी चूक कबुल करून यापुढे असा प्रकार हाेणार नाही असे सांगून बाेळवण केली.

शहरातील आंबेडकर मार्केट परिसरातील राजेश हटकर यांना शुक्रवारी भुसावळ येथून सुटणाऱ्या कटनी पॅसेंजरने नेपानगरला जायचे होते. त्यामुळे त्यांनी जळगावातूनच नेपानगरचे २५ रुपयांचे तिकीट काढले. त्यानंतर सकाळी ८.४० वाजता ते सुरत-भुसावळ पॅसेंजरने भुसावळला गेले. या पॅसेंजरला कटनी पॅसेंजर अटॅच आहे. पण भुसावळात गेल्यानंतर हटकर यांना कटनी गाडी रद्द झाल्याचे कळल्यानंतर धक्काच बसला. तसेच गाडी रद्द असताना जळगावच्या तिकीट घरातून या गाडीचे तिकीट कसे दिले? असा प्रश्न पडला. याचे उत्तर शोधण्यासाठी ते भुसावळच्या तिकीट घरात गेले. पण तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना जळगावच्या तिकीट घरात संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते एसटीने जळगावात आल्यानंतर दुपार १२.३० वाजता रेल्वे स्थानकावरील तिकीट घरात गेले. पण तेथील कर्मचाऱ्यांनीही त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली; तर रेल्वे पोलिसांनी त्यांची खिल्ली उडवली. त्यामुळे हटकर यांना आर्थिक भुर्दंड तर बसला शिवाय खूप मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार दररोज घडत असून अनेक प्रवासी त्रस्त झाले आहेत.
राजेश हटकर यांनीं काढलेले नेपानगरचे तिकीट
रेल्वेप्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळाल्यामुळे हटकर दुपारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात अाले. त्यांनी घडलेला सर्व प्रकार प्रतिनिधीला सांगितला. त्यामुळे प्रतिनिधीने स्टेशन मास्तरांशी संपर्क साधून या बाबत हकिगत सांगितली; त्या वेळी त्यांनी यापुढे प्रवाशांना तिकीट काढताना रद्द गाड्यांची माहिती दिली जाईल, असे आश्वासन दिले. हटकर यांना आलला अनुभव दररोज अनेकांना येतो, परंतु कोणीही बोलत नसल्याने तो उजेडात येत नाही. त्यामुळे रेल्वेने प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्याची गरज आहे.
आता कल्पना देतो
यापुढेजळगाव रेल्वे स्टेशनवरून इटारसीकडे जाणाऱ्या पण रद्द झालेल्या सर्व गाड्यांची माहिती दिली जाईल. तशी वेगळी व्यवस्था करण्यात येईल. तसेच राजेश हटकर यांच्यासोबत झालेला प्रकार गंभीर असून यापुढे तसे घडू नये याबाबत काळजी घेऊ. ए.एस.कुळकर्णी,स्टेशन मास्तर, जळगाव
बातम्या आणखी आहेत...