आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर वऱ्हाडाच्या ट्रॅक्टरला ट्रकची धडक; चार ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळनेर- धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर शेलबारी गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्याने चार जण ठार झाल्याची घटना साेमवारी दुपारी घडली. पिंपळनेर येथील महिला भिलाटी व बोरबन भिलाटीतील दोन वधूंचे लग्न शेलबारी येथील दाेन वरांबरोबर सोमवारी होते. त्यासाठी पिंपळनेर येथील भिलाटीतील वऱ्हाड ट्रॅक्टरने गेले होते.

लग्नानंतर वऱ्हाड परत पिंपळनेरकडे येत असताना सटाण्याकडे जाणाऱ्या ट्रकने (क्र.एमएच १८ एए ३०१६) ट्रॅक्टरला (एमएच १८ झेड ५६७) समाेरून जोरदार धडक दिली. त्यात तीन जण जागीच ठार झाले तर ४० जण गंभीर जखमी झाले. यातील एकाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सुमारे ३३ जखमींवर पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मृतांमध्ये विनोद शिवाजी माळी (२२), संजय बाबूलाल माळी (३०, रा. बोरबन भिलाटी) व ट्रॅक्टरचालक भावा धर्मा माळी (३३, रा. टेकपाडा भिलाटी) यांचा समावेश आहे.

तर जखमींची नावे अशी, सागर ईश्वर माळी (१८), विश्वास दिलीप पवार (२०), भास्कर राजाराम धुमाळ (२७, ईदगावपाडा), भरत दिलीप पवार (२४), सागर गुलाब मालुसरे (२६), उत्तम धर्मा पवार (५०), न्हानू सुधाकर सोनवणे (२१), सागर सुमंत सोनवणे (१४), पिंटू तानाजी पवार (३४, देशशिरवाडे), लखन किशोर माळी (३५), दत्तू धर्मा बोरसे (६०), नितीन मधुकर सोनवणे (२५), भरत देविदास पवार (२४), शोभा विठ्ठल सोनवणे (३८), मधुकर सुधाकर सोनवणे (२५), योगेश मधुकर सोनवणे (१७), बापू तुळशिराम सोनवणे (६०), गुलाब ईश्वर माळी (१३), विष्णू हिंमत माळी (१७), ज्ञानेश्वर सुधाकर सोनवणे (२९), मनोहर सुधाकर सूर्यवंशी (२९), विश्वास दिलीप पवार (२०), लताबाई सुभाष सोनवणे (३५), सुभाष दादाजी सोनवणे (४०), धना संभाजी बोरसे (१५), गणेश शिवाजी बोरसे (१२), परशराम विठ्ठल सोनवणे (१५), संगीता छोटू सोनवणे (३५), सोनीबाई संभाजी पवार (५५), भरत माणिक ठाकरे (१२), भटीबाई माणिक ठाकरे (४०), अर्जुन महादू बोरसे यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात डॉ. जितेश चौरे, डॉ. सत्यजित सोनजे, डॉ. दयानंद कोतकर, डॉ. कैलास पगारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल सोनवणे, डॉ. यतीश घरटे, डॉ. विवेकानंद शिंदे, डॉ. जोशी, डॉ. कैलास टाटिया, डॉ. ज्ञानेश्वर पगारे यांनी रुग्णांवर उपचार केले. पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि ज्ञानेवर वारे, पोऊनि डी.के. जाधव, पो. कॉ. ललित पाटील, महेंद्र कापुरे यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहाेचविले.
बातम्या आणखी आहेत...