आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Transaparta Associates,,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागेच्या कराराची मुदत वाढवा; अन्यथा पर्यायी जागा तरी द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ट्रान्सपोर्टनगरसाठी दिलेल्या जागेच्या कराराला मुदतवाढ मिळावी. मुदतवाढ देणे शक्य नसल्यास पर्यायी जागा तरी देण्यात यावी, अशी मागणी ट्रान्सपार्ट असोशिएशनच्या पदाधिका-यांनी बुधवारी झालेल्या सुनावणी वेळी केली आहे. मुदतवाढ किंवा पर्यायी जागेचा विषय धोरणात्मक असल्याने आयुक्त तसेच स्थायी सभापतींसोबत बैठक घेऊन या मुद्यांवर चर्चा करण्याचे नगररचना सहायक संचालकांनी सांगितले.
पालिकेच्या मेहरूण सर्व्हे नंबर ३०मधील ट्रान्सपोर्टनगरची जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वी पालिकेने ३० मे २०१३ रोजी नोटीस बजावली होती. त्या अनुशंगाने असोसीयिएशनच्या चेअरमनला आपले मत मांडण्यासाठी बुधवारी सायंकाळी वाजता नगररचना सहायक संचालक चंद्रकांत निकम यांच्याकडे बैठक झाली. असोसीयिएशनचे अध्यक्ष जसपालसिंग बग्गा, करणसिंग सैनी, अरुण दलाल, विनोद कासट, अशोक वाघ उपस्थित होते.
चर्चेसाठी आलेल्या पदाधिका-यांना अवश्‍यक त्या कागदपत्रांसह हजर राहण्याचे सांगितल्याने काही जुने ठराव इतर कागदपत्रे नगररचना सहायक संचालकांकडे सादर केले.
प्रशासनाने ९९ वर्षांच्या कराराने जागा दिल्याने त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. ते शक्य नसल्यास पालिकेने दूरदर्शन टॉवर परिसरातील जागा पर्यायी जागा म्हणून देण्याची विनंती केली. मात्र, हा धोरणात्मक विषय असल्याने स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा, अयुक्त संजय कापडणीस यांच्याशी चर्चा करणे योग्य राहील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.