आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात बँडेज विसरणाऱ्या डाॅक्टरवर बदलीची ‘मलमपट्टी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रसूतीनंतरच्या शस्त्रक्रियेत शरीरात कॉटन बँडेज तसेच ठेवून टाके देण्याचा प्रकार घडला होता. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ.चेतन पाटील यांची मंगळवारी सिव्हिल प्रशासनाने दुसऱ्या विभागात तडकाफडकी बदली केली आहे. तसेच डाॅक्टरला तंबी देऊन त्यांच्याकडून लेखी जबाब लिहून घेण्यात आला आहे.

सिव्हिलमध्ये एप्रिल रोजी पायल विशाल तुंडलायत या गर्भवतीची नाॅर्मल प्रसूती झाली होती. ही प्रसूती डॉ.चेतन पाटील यांनी केली होती. प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव झाल्यामुळे कॉटन बँडेजचा वापर करण्यात आला. त्यानंतर हे बँडेज काढून घेता त्यावरूनच टाके देण्यात आले हाेते. या प्रकारामुळे पायल यांना प्रचंड त्रास झाल्यामुळे सोमवारी खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून बँडेज काढण्यात आला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. हे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी डॉ.चेतन पाटील यांना तंबी देऊन यापुढे रुग्ण हाताळताना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्यांची तडकाफडकीत प्रसूती विभागातून दुसऱ्या वॉर्डात तात्पुरती बदली केली आहे.

मनुष्यबळाचीगंभीर समस्या
सिव्हिलच्याप्रसूती विभागात केवळ चार तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. त्यांच्याशिवाय मदतनीस सेवा देतात. डॉ.चेतन पाटील हे सोलापूरहून २० दिवसांपूर्वीच सिव्हिलमध्ये दाखल झाले आहेत. प्रसूती विभागात दररोज सुमारे २५ महिलांची प्रसूती होते. त्यामुळे डॉक्टरांवर कामाचा ताण वाढतो, ही समस्या दूर करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्याप कारवाई झाली नसल्याचे प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
जिल्हाधिकारी १६ रोजी सिव्हिलला भेट देणार
जिल्हासामान्य रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे मुले पळवण्याच्या घडलेल्या घटना शस्त्रक्रिया करताना महिलेच्या शरीरात बँडेज राहून गेल्याच्या घटनेमुळे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल शनिवारी सिव्हिलची तपासणी करणार आहेत. या वेळी स्वच्छता, उपकरणांची देखील तपासणी केली जाईल. रुग्णसेवेबाबत डॉक्टरांनी तडजोड करता कामा नये. आरोग्यसेवा मिळणे हा रुग्णांचा अधिकार आहे. खेड्यापाड्यातून आलेल्या गरजू रुग्णांवर उपचार करण्यास डॉक्टर्स हलगर्जीपणा करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. सिटीस्कॅन मशीन बसवण्याबाबतही त्या प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत.