आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडोबा मुलांसह आई-बाबांची पोलिसांकडून कानपिळणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विना नंबर प्लेट, सुसाट वाहने चालवणाऱ्या अल्पवयीन मुलांसह त्यांच्या पालकांनी शनिवारी पाेलिस अधीक्षकांसमोर हजेरी लावली. त्यांची चांगलीच कानपिळणी करण्यात आली. या वेळी काही पालकांनी प्रतिप्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर संताप व्यक्त करीत डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी मुलांना अल्पवयात दुचाकी मोबाइल घेऊन दिल्यानंतर होणारा वाहतूक नियमांचा भंग अपघातांना सर्वस्वी पालकच जबाबदार असल्याचे सांगितले.

शुक्रवारी १०० दुचाकी जप्त केल्या होत्या. या दुचाकी परत मिळवण्यासाठी मुलांनी शुक्रवारी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. मात्र पोलिसांनी दुचाकी देण्यास नकार दिला होता. शनिवारी सकाळी ११ वाजता पोलिस अधीक्षकांनी मुलांना पालकांसह शहर वाहतूक शाखेत बोलावले होते.
अपघाताने नुकसान
आजप्रत्येकाला घाई झाली आहे. मुलांना वाहन घेऊन देताना पालकांनी वेळीच सावध झाले पाहिजे. कारण अपघाताने झालेले नुकसान कधीही भरून निघणारे आहे. ज्यांची मुले अपघातात मत्युमुखी झाली आहेत; त्यांना भेटा म्हणजे वाहतूक नियमांचे महत्त्व कळेल, असे अधीक्षक सुपेकर म्हणाले.
पोलिस ठाण्यात वाहने घेण्यासाठी आलेले पालक मुले.

अल्पवयीन मुले कारही चालवतात
केवळ१२ वर्षांची मुले भरधाव दुचाकी चालवताना आढळून येतात. त्यातच ते वाहन चालवताना मोबाइलवर बोलत असतात. मुलांना शिकवणी लावली तर त्यांना शिकवणीला सोडण्याची जबाबदारी पालकांची आहे. पालक त्यांना दुचाकी घेऊन देतात. मात्र, मुले सर्रास वाहतूक नियमांचा भंग करतात. याबाबत चुकी पालकांचीच आहे.

रस्त्यांची अवस्था बघता ३५ पेक्षा कमी वेग असावा
शहरातीलरस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता ३५ कि.मी.पेक्षा कमी वेग असावा. मात्र, मुले ५० पेक्षा जास्त वेगाने वाहने चालवतात. त्यात मुलीही आघाडीवर आहेत. त्यासुद्धा ट्रिपल सीट वाहन चालवताना दिसतात. शहरातील काही भागात मुले रात्री १० वाजेनंतर रॅश ड्रायव्हिंग करताना निदर्शनास आले आहेत. त्या धूम बाइकर्सवर कारवाई करण्यासाठी त्या भागात नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानंतर दुचाकी ताब्यात देण्यात आल्या. पालक पैसे भरून दुचाकी नेत होते. प्रत्येकी ३०० रूपयांप्रमाणे दंड केला.