आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘टार्गेट’ वाढवल्याने वाहतूक विभागाची वाहनांवर कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ऐनसणासुदीच्या काळात बाजारपेठेत गर्दी वाढलेली असताना वाहतूक शाखेनेही गुरुवारी अचानक कारवाईची मोहीम उघडली. यात प्रमुख चाैकांमध्ये वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या दुचाकीस्वारांना टार्गेट करण्यात अाले. दिवसभरात सुमारे १२२ जणांवर दंडात्मक कारवाई करून २६ हजारांचा दंड वसूल करण्यात अाला अाहे. दरम्यान, पोलिसांना वाहनांवर कारवाई करण्याचे टार्गेट वाढवून दिल्याने गुरुवारी मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत वाहतूक नियमांना जुमानता बिनधास्तपणे सुसाट वाहने चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले अाहे. यात महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा समावेश अधिक आहे. तसेच सध्या दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत प्रचंड गर्दी वाढली असून पार्किंगचीही समस्या उभी राहिली आहे. त्यामुळे अनेक वाहने दुचाकी रस्त्यावरच लावल्या जात असल्याने वाहतुकीच्या कोंडीत भर पडली आहे. बेशिस्तपणे पार्किंग वाहने चालवणाऱ्यांना शिस्त लागावी, या उद्देशाने वाहतूक शाखेने अाता कारवाईची माेहीम सुरू केली अाहे. याचा फटका पहिल्याच दिवशी १२२ दुचाकी चालकांना बसला.

विद्यार्थ्यांकडील वाहनांचा अाकडा अधिक : शहरातवाहनांची संख्या वाढत असून यात विद्यार्थ्यांकडील वाहनांचा अाकडा अधिक अाहे. वेगाने वाहने चालवणे, ट्रिपल सीट दुचाकी चालवणे, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक शाखेने गुरुवारी चाैकाचाैकात विद्यार्थ्यांचे वाहन परवान्याची तपासणी केली.

या भागात केली कारवाई
आकाशवाणी चौकात वाहनांची तपासणी करताना शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी.

दिवाळीपर्यंत कारवाई सुरूच राहणार
^दिवसभरात १२२ दुचाकीस्वारांवर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच एक ड्रंक अॅन्ड ड्राइव्हची केस करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला अाहे. दिवाळीसंपेपर्यंत ही माेहीम सुरूच ठेवणार अाहाेत. अनिलदेशमुख, पाेलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात शहरातील २० पेक्षा जास्त चाैकात वाहतूक शाखेने लक्ष केंद्रीत केले हाेते. यात अवैध प्रवासी वाहतुकीला अाळा घालण्यासाठी स्पेशल माेहीम राबवण्यात अाली. यासाठी भुसावळकडून शहरात येणाऱ्या कालिंकामाता चाैकात तसेच अजिंठा चाैकाकडून आकाशवाणी चाैकाकडून शहरात येणाऱ्या सर्वच चाैकात ही कारवाईची मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे बाजारासाठी येणाऱ्या महिला तरुणींवरही परवाना नसल्याने कारवाई झाली.
बातम्या आणखी आहेत...