आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रॅव्हल्स् कलंडल्‍याने दोन ठार तर १३ प्रवासी जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कंडारीजवळएसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात शुक्रवारी भरधाव ट्रॅव्हल बस कलंडली. या भीषण अपघातात एका चार वर्षांच्या चिमुकल्यासह गाडीचा क्लीनर असे दोन जण जागीच ठार झाले; तर १३ प्रवासी जखमी झाले.
शेंदुर्णीहून सुसाट वेगाने जळगावकडे येणाऱ्या या ट्रॅव्हल्सचालकाने कंडारी-उमाळा फाट्याजवळ एका एसटीला ओव्हरटेक केल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. पुढे जाण्याच्या नादात या ट्रॅव्हलने एका दुचाकीलाही उडवले अाणि गाडी रस्त्यातच धाडकन कलंडली. अपघातानंतर चालक फरार झाला. रस्त्यात गाडी पडल्यामुळे महामार्गावर सुमारे दीड तास वाहतुकीची कोंडी झाली होती.

कृष्णा शंकर राजपूत (वय ३३, रा. लोहारा, ता. पाचोरा) आणि राहिलखान कामिलखान पठाण (वय ४, रा. पहूर) अशी मृतांची नावे आहेत. शेंदुर्णी येथील सपना ट्रॅव्हल्स कंपनीची ही बस (एमएच- १९, जे- १२९४) अाहे.चालक रवींद्र पाटील हा सुद्धा शेंदुर्णीचा असून अपघातानंतर तो पळून गेला. सकाळी वाजून ४५ मिनिटांनी शेंदुर्णी येथून सुमारे २५ प्रवासी घेऊन ही ट्रॅव्हल्स जळगाव येथे येण्यासाठी सुटली होती. ७.३० वाजता कंडारी ते उमाळा फाट्यादरम्यान पोहोचल्यावर एसटी बसला ओव्हरटेक केल्यामुळे भरधाव असलेल्या ट्रॅव्हल्सवरून चालकाचा ताबा सुटला. त्याने कडेला उभ्या असलेल्या एका दुचाकीला धक्काही दिला. वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालकाने अर्जंट ब्रेक दाबल्यामुळे क्लीनरच्या बाजूने ही ट्रॅव्हल्स कलंडली.
यात क्लीनर कृष्णा चार वर्षीय बालक राहिलखान यांचा मृत्यू झाला; राहिलची आई सुफियाबी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या जबड्याजवळ लोखंडी रॉड घुसल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही किरकोळ जखमी प्रवासी घटनास्थळावरून तर काही जिल्हा रुग्णालयातून घरी निघून गेले. या अपघातात आनंदा चव्हाण हे पोलिस कर्मचारीदेखील जखमी झाले आहेत. दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रॅव्हल्सचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहेरची भेट राहिली अपूर्ण
अपघातातपठाण कुटुंबातील चार सदस्य जखमी झाले, तर एक बालक मृत्युमुखी पडला. सुफियाबी पठाण यांचे कासोदा हे माहेर आहे. त्या कुटुंबीयांसह पहूर येथून जळगाव जळगाव येथून कासोदा येथे जाण्यासाठी निघाल्या होत्या. अपघातामुळे त्यांची माहेरच्या माणसांची भेट होऊ शकली नाही. चार वर्षांचा मुलगा राहिलचा मृत्यू झाला, तर सुदैवाने दीड वर्षाच्या कश्मिराला मात्र साधे खरचटलेही नाही.

कृष्णाघरातील कर्ता पुरुष
मृतक्लीनर हा राजपूत कुटुंबातील कर्ता पुरुष होता. गेल्या आठ वर्षांपासून ते या क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा एक मुलगा, तीन वर्षांची एक मुलगी, तीन अविवाहित भाऊ, आई-वडील आहेत. कृष्णा राजपूत हे घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे नातेवाइकांनी सामान्य रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला.

प्रचंड किंचाळ्या
अपघातानंतरप्रवाशांच्या किंचाळ्या नागरिकानी ऐकल्यानंतर ते धावत आले. त्यांनी जखमी भेदरलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मागच्या बाजूचा आपत्कालीन खिडकीच्या काचा फोडून त्यांना बाहेर काढले.

बालिका बचावली
अपघातातखान कुटुंबातील सदस्य जखमी झाले. तर वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. सुदैवाने या बालकाची लहान बहीण कश्मिरा मात्र सुखरूप आहे. ती नागरिकांच्या अंगावर पडल्याने तिला साधे खरचटले सुद्धा नाही.

योगायोगाने आली रुग्णवाहिका
अपघातानंतर१० मिनिटातच योगायोगाने पहूर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिका जळगावला येत होती. याच रुग्णवाहिकेतून जखमींना जळगावात आणण्यात आल्याची माहिती जखमी किरण चिमणकर याने दिली. किरण क्लीनरच्या मागे तिसऱ्या सीटवर बसून प्रवास करीत होता. अपघातामुळे त्याच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली आहे. जखमी अवस्थेतच त्याने मोबाइल शोधून मित्रांना माहिती कळवली.
कंडारीते उमाळा फाटा ह्या एक किलोमीटर अंतरावर दोन बस थांबे आहेत. कंडारीपेक्षा उमाळा फाट्यावर जास्त प्रवासी मिळतात या लोभामुळे ट्रॅव्हल्सचालकाने एसटीला ओव्हरटेक केल्यामुळे अपघात झाला. जळगाव ते शेंदुर्णी या मार्गावर दिवसभरातून शेकडो प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करतात. सर्व ट्रॅव्हल्सचालकांमध्ये प्रवासी मिळवण्याची जीवघेणी स्पर्धा सुरू राहते.
फाट्यावर उभ्या असलेल्या सुमारे ते १० जणांनी या अपघाताचा थरार पाहिला. फाट्यावर दुचाकी, चारचाकी पंक्चरचे दुकान चालवणारे विनोद खडसे हे देखील प्रत्यक्षदर्शी आहेत. खडसे यांनी सांगितल्यानुसार अपघातग्रस्त ट्रॅव्हल्सचालकाने कंडारी फाट्यावर गाडी थांबवली नाही. त्यानंतर सुमारे ४० मीटर पुढे असलेल्या एसटीला ओव्हरटेक करण्यासाठी वेग वाढवला. भरधाव ओव्हरटेकही यशस्वी झाला. तसेच त्याने डाव्या बाजूला वेगातच वळण घेतले. याचवेळी रस्त्याच्या कडेला भगवान खडसे (रा. उमाळा) यांची दुचाकी उभी होती. वेगामुळे ट्रॅव्हल्सचे डाव्या बाजूचे दोन्ही चाके रस्त्याच्या खाली उतरले होते. त्यामुळे ट्रॅव्हल्सने सुरुवातीला दुचाकीला धक्का दिल्याने ती रस्त्याच्या कडेला पडली. वेगात असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने नियंत्रण मिळवण्यासाठी अर्जंट ब्रेक दाबले. परिणामी गाडी डाव्या बाजूला उलटली. १० फूट फरफटत जाऊन ट्रॅव्हल्स रस्त्याच्या मधोमध आडवी पडली. या अपघातामुळे प्रचंड आवाज झाला. हे पाहून उमाळा, कंडारी फाट्यावरील नागरिक, ईश्वर पेपर मिलमधील कर्मचारी, ओव्हरटेक केलेल्या एसटीमधील प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदत केली.
पुढील स्‍लाइडवर वाचा उर्वरीत माहिती...