आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रॅव्हल्सवर नजर ठेवण्यासाठी पथक, शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ट्रॅव्हल्सला शहरात प्रवेश करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिवाळीनिमित्त २५ अाॅक्टाेबर ते १० नाेव्हेंबरपर्यंत तात्पुरती परवानगी दिली अाहे. त्यामुळे शहरात थांबणाऱ्या ट्रॅव्हल्सवर नजर ठेवण्यासाठी शहर वाहतूक विभाग एक विशेष पथक नियुक्त करणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
वाहतुकीला अडथळा हाेऊ नये, म्हणून शहरात ट्रॅव्हल्सला बंदी करण्याचे अध्यादेश दिले हाेते. त्या संदर्भात ट्रॅव्हल्समालकांनी न्यायालयात अपील केले हाेते. त्यात २१ अाॅक्टाेबरला न्यायालयाने ट्रॅव्हल्सला २५ अाॅक्टाेबर ते १० नाेव्हेंबरपर्यंत शहरात येण्यास परवानगी दिली अाहे. मात्र, रस्त्यावर थांबणे, प्रवासी उतरवणे किंवा चढवण्यास परवानगी दिलेली नाही. ट्रॅव्हल्सवर लक्ष ठेवण्यासाठी वाहतूक पाेलिसांचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात अाले अाहे. ते पथक पहाटे ते सकाळी अाणि रात्री ते १० वाजेदरम्यान अाकाशवाणी चाैफुली ते रेल्वेस्थानकादरम्यान गस्त घालणार अाहेत. जर ट्रॅव्हल्स चालकांनी प्रवासी उतरवले किंवा बसवले तर त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे पाेलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...