आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावमध्ये वीज अभियंत्याकडून वृक्षतोड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहालगत असलेल्या जागेवर नर्सरी थाटलेल्या एमएसईबी अभियंत्याने पावसाळ्यात पडाऊ वृक्ष असल्याचे भासवून सुबाभूळची झाडे तोडण्याचा प्रकार चालवला आहे. रविवारी सुटीचा दिवस पाहून दोन झाडांच्या मुळांवर घाव घालण्यात आले असून, त्यातील एक झाड कोसळले.
आकाशवाणी चौकातून इच्छादेवी मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला महामार्गाच्या मालकीची जागा आहे. या जागेवर दोन-तीन वर्षांपासून एमएसईबीच्या मनमाड विभागात अभियंता असलेल्या जळगावातील दौलत नगरात राहणार्‍या प्रभाकर पाटील यांच्या मुलाने ‘निनाद नर्सरी’ सुरू केली आहे. या नर्सरीला चारही बाजूंनी तार कंपाउंड करण्यात आले असून, लाडवंजारी मंगल कार्यालयासमोरील बाजूला प्रवेशद्वार ठेवले आहे. प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुबाभूळच्या दोन झाडांना कुर्‍हाडीने तोडण्याचा प्रकार रविवारी सुरू होता. त्यातील एक झाड रात्री कोसळल्यावर त्याच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू होते, तर दुसर्‍या वृक्षाच्या मुळावर घाव घालून त्यावर माती टाकून झाकण्यात आले होते.
सदर नर्सरी मी चालवत नसून मझा मुलगा चालवितो. झाड पावसामुळे उन्मळून पडले आहे. ते तोडलेले नाही. प्रभाकर पाटील, अभियंता, मनमा