आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाड र्तोडी : पोलिस अधीक्षकांवर कारवाईस चालढकल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - विनापरवानगी वृक्षतोड करणा-या सामान्य नागरिकांसह पदाधिका-यांवरही गुन्हे व खटले दाखल करणा-या महापालिकेतर्फे पोलिस अधीक्षक कार्यालयातील वृक्षतोडीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात येत आहे. अजून घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे कष्टही महापालिकेच्या अधिका-यांनी घेतले नाही.
महापालिका हद्दीत वृक्षतोड किंवा फांद्या तोडण्यापूर्वी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेणे आवश्यक असते. पोलिस अधीक्षक कार्यालयाने महापालिकेकडे वीज तारांना अडथळा होतो म्हणून दोन झाडांच्या फांद्या कापण्याची परवानगी मागितली. प्रत्यक्षात झाडेच तोडल्याचा प्रकार ‘दिव्य मराठी’ ने निदर्शनास आणून दिला. सामान्य माणसाने वृक्षतोड केल्यास घटनास्थळाचा पंचनामा करून कारवाई करणाºया महापालिकेच्या अधिकाºयांनी पोलिस अधीक्षक कार्यालय आवारातील वृक्षतोडीकडे दुर्लक्ष केले आहे. वृक्ष अधिकारी प्रभाग अधिकाºयांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत.
चौकशीचे आदेश - पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या अवैध वृक्षतोडप्रकरणी पोलिस अधीक्षक एस. जयकुमार यांनी चौकशीचे आदेश दिले असून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी राखीव पोलिस निरीक्षकांना दिल्या आहेत. अहवाल आल्यानंतर संबंधित दोषी व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कायदेशीर कारवाई होणारच - पोलिस अधीक्षक कार्यालय आवारात झालेल्या वृक्षतोडप्रकरणी शाखा अभियंत्यांकडून अहवाल मागविला आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच स्वत: घटनास्थळाचा पंचनामा करून इतरांप्रमाणे पोलिस अधीक्षक कार्यालयातील जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येईल. कारवाईत कुचराई नाही. उदय पाटील, प्रभाग अधिकारी
पोलिस अधीक्षक कार्यालय आवारातील सावट व सुबाभूळ या वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी थेट झाडेच तोडली. याप्रकरणी घटनास्थळाचा पंचनामा करण्याची जबाबदारी प्रभाग अधिकाºयांची आहे. दोन-तीन दिवसांत कारवाई न झाल्यास बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली जाईल. दिलीप सूर्यवंशी, वृक्ष अधिकारी
वृक्षतोडीची दुर्दैवीच घटना म्हणावी - ज्यांनी वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवले पाहिजे, जो कोणीही चुकीचे काम करीत असेल त्यावर अंकुश ठेवला पाहिजे. तेच जर कायदा मोडत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते असू शकते. ही बाब निंदणीय व गंभीर आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे.
राजेंद्र नन्नवरे, संचालक,पर्यावरण शाळा
कुंपणानेच शेण खाण्याचा प्रकार - पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात झालेली वृक्षतोड म्हणजे कुंपनच शेण खाण्याचा हा प्रकार आहे. कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनले असल्याचेच यातून सिद्ध होते. पोलिसांनीच झाडे कापावीत याला काय म्हणावे? असा प्रश्न मनात निर्माण होतो. सचिन ठाकूर, निर्सगप्रेमी
पालिकेने गुन्हा दाखल करावा - झाडे छाटण्याची परवानगी घेऊन झाडे कापण्याचा जो प्रकार पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात झाला आहे. तो अत्यंत निंदणीय व गंभीर आहे. त्यांच्याकडे आमच्यासारखे निसर्गमित्र तक्रार करण्यास जातात, त्यांनीच असा गुन्हा केल्यास आता आम्ही कोणाकडे तक्रार करावी, असाच प्रश्न आहे. महापालिकेने याप्रकरणी तक्रार देऊन गुन्हा दाखल झाला पाहिजे. बाळकृष्ण देवरे, निसर्गप्रेमी