आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीप स्टार टाइल्स कंपनीत ५६ डेरेदार वृक्षांची कत्तल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - एमआयडीसीतीलएम १५१ या दीप स्टार टाइल्स प्रा. लि. या कंपनीच्या आवारातील ५६ डेरेदार वृक्षांची कत्तल झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या २० दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. रविवारी झाडे तोडली. वन्यजीव संरक्षण संस्थेचे वासुदेव वाढे यांनी हस्तक्षेप करीत वृक्षतोड रोखली. याप्रकाराबाबत वाढे यांनी मनपा, वनविभाग, एमआयडीसीला निवेदनाव्दारे माहिती दिली होती. पण कुणीही या प्रकाराकडे लक्ष दिले नाही. दरम्यान, या प्रकरणी ‘दिव्‍य मराठी’ने दीप स्टार टाइल्स कंपनीचे मालक विजय लोढा यांना विचारणा केली असता त्यांनी मी बाहेरगावी असल्याने वृक्षतोडीबाबत मला काहीही माहित नाही, असे सांगितले.

तिन्हीविभागांची टोलवाटोलवी
वाढेयांनी २० दिवसांपूर्वी सर्वांत आधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी निवेदन घेतले खरे पण तो भाग मनपाच्या अख्त्यारीत येत असल्याने आम्ही कारवाई करू शकत नाही, असे उत्तर दिले. मनपाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी एमआयडीसीचा स्वतंत्र विभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर वाढे एमआयडीसीच्या विभागात गेले. त्यांनी पुन्हा वृक्षतोड थांबवण्याचे काम मनपाचे असल्याचे सांगितले. पर्यावरणाशी संबंधित निवेदन असतानाही या तिन्ही विभागांनी आपली जबाबदारी झटकली.

वास्तविक एमआयडीसीत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने वृक्षांची संख्या वाढवली पाहिजे. मात्र, उद्योजकच वृक्षतोड करीत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. तर दुसरीकडे हा प्रकार थांबवणार कोण? याचीही जबाबदारी निश्चित झालेली नाही.

वृक्षतोड थांबवणे एवढाच उद्देश
वृक्षतोडथांबली पाहिजे एवढ्या एकाच उद्देशाने महापालिका, वन एमआयडीसी विभागाला निवेदन दिले. मात्र, कुणीही पुढाकार घेतला नाही. आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. वासुदेववाढे, सदस्य,वन्यजीव संरक्षण संस्था
वृक्ष तोडण्यासाठी आम्ही आलो होतो
दीपस्टार टाइल्स या कंपनीचे मालक कोण आहेत हे आपणास माहित नाही. त्यांनी केवळ वृक्ष तोडण्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही झाडे तोडण्यासाठी आलो होतो, अशी उत्तरे वृक्ष तोडणाऱ्यांनी वाढे यांना दिली. वन्यजीव संरक्षण संस्थेनेच गेल्यावेळी येथील वृक्षतोड थांबवली होती. काही दिवसांच्या िवश्रांतीनंतर रविवारी पुन्हा झाडांवर कुऱ्हाडी चालल्या.