आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tree Department Metting Canceled In Dhule Due To Oddicers Not Present

अनास्था : वृक्ष प्राधिकरणाची पहिलीच बैठक गेली वाया; कोरमही झाला नाही पूर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या तब्बल तेरा सदस्यांनी बैठकीला दांडी मारून वृक्षसंवर्धनाच्या कामाबाबत अनास्था दाखवून दिली. वर्षभरानंतर मंगळवारी पहिलीच बैठक झाली. यासाठी १५ पैकी केवळ दोन सदस्य उपस्थित होते. सकाळी ११ वाजता सभेला सुरुवात झाली. मात्र, ११.४५ पर्यंत केवळ दोन सदस्य आले. त्यामुळे सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे यांनी कोरमअभावी सभा तहकूब केली.

शहरातील शासकीय खासगी वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेत वृक्ष समिती गठीत करण्यात आली आहे. मागील समितीची १२ जून २०१३ रोजी शेवटची बैठक झाली होती. नवी समिती दि. ११ ऑगस्ट २०१४ रोजी गठीत करण्यात आली. त्यानंतरही या समितीची बैठक झाली नव्हती. मंगळवारी या समितीची पहिलीच बैठक घेण्यात आली.
सकाळी ११ वाजता आयुक्तांनी प्राधिकृत केलेले सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, अभियंता कैलास शिंदे, ओव्हरसियर प्रदीप चव्हाण, सचिव मनोज वाघ सभागृहात दाखल झाले; परंतु ११.३० नंतरही कुणी सदस्य सभागृहात दाखल झाले नाही. तर ११.३० नंतर केवळ दोन सदस्य उपस्थित झाले. अखेर ११.४५ वाजता कोरमअभावी ही बैठक सहायक आयुक्त कांबळे यांनी तहकूब केली आहे.

दोघांचीच होती हजेरी
वृक्ष प्राधिकरण समितीत १५ नगरसेवक सदस्य आहेत. यात अधिकाऱ्यांसह २२ जणांचा समावेश आहे. मंगळवारी झालेल्या पहिल्याच बैठकीला रश्मीबानो अकिल अहमद जुलाहा आिण इस्माईल खान पठाण हे दोघे नगरसेवक सदस्य उपस्थित होते.
नव्याने होईल बैठक
वृक्ष प्राधिकरणाची ही पहिलीच बैठक घेण्यात आली. त्यासाठी या समितीतील सर्व सदस्य नगरसेवकांना विषयपत्रिका पाठविण्यात आल्यावरही ते उपस्थित नसल्याने ती तहकूब करण्यात आली आहे. मात्र ही बैठक पुन्हा काही दिवसांत घेण्यात येणार आहे.
हे होते अनुपस्थित
या समितीत पंधरा नगरसेवक सदस्य आहेत. त्यापैकी केवळ दोन उपस्थित होते. तर मनोज मोरे, जगदीश गायकवाड, सोनल शिंदे, महंमद अन्सारी, उमर शव्वाल, रमेश बोरसे, नलिनी वाडिले, ललिता आघाव, प्रभावती चौधरी, संजय गुजराथी, वालीबेन मंडोरे, सुशीलाबाई ईशी, प्रशांत श्रीखंडे आदी अनुपस्थित होते.
बैठकीत होते २१ विषय
वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत विषयपत्रिकेवर २१ विषय होते. त्या विषयांवर चर्चा होणार होती. मात्र, बैठक तहकूब झाली आहे. या बैठकीत प्रामुख्याने १२३४ सागाची झाडे तोडणे, निवासी घरासमोरील झाड पूर्णपणे तोडणे, धोकादायक फांद्याची छाटणी करणे यासाठी अर्ज समितीकडे करण्यात आले आहेत. मात्र वर्षभर समितीच गठीत झाली नव्हती. तर आता बैठक घेतल्यावर सदस्य नाही. त्यामुळे नागरिकांसाठी हे अडचणीचे ठरले आहे.