आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्येष्ठांच्या उत्साहाला तरुणाईची खंबीर साथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वृक्ष लागवडदिनाचे आैचित्य साधून लांडोरखोरीच्या सुमारे १७३ एकरच्या विस्तीर्ण परिसरात महापौर नितीन लढ्ढा, खासदार ए.टी.पाटील, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्यासह शहरातील राजकीय नेते, उद्योगपती, वरिष्ठ शासकीय अधिकारी आदी मान्यवरांनी शुक्रवारी आपल्या जन्म नक्षत्रानुसार वृक्षारोपण केले. मोहाडी आणि पाचोरा रस्त्याच्या मधोमध वनविभागाच्या वतीने सुमारे १७३ एकर परिसरात जैवविविधता पार्क अाकारास येत असून याठिकाणी विविध धर्माची वैशिष्ट्ये असलेली झाडेही लावण्यात येणार आहेत.
राज्य शासनाने जुलै रोजी वृक्षलागवडदिनी राज्यभरात दोन कोटी वृक्ष लावण्याची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली होती. पर्यावरण संवर्धनाच्या या मोहिमेस जळगावात उदंड प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, विविध संस्था, संघटनांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वृक्षलागवड अभियानाचा प्रमुख कार्यक्रम अंजन, पळस, सळई, खैर अशा वृक्षरांजीने बहरलेला, हिरव्या रंगाची दुलई पांघरलेल्या निसर्गरम्य परिसरात शुक्रवारी खडसे यांनी आपल्या धनिष्ठा नक्षत्रानुसार शमीचे झाड लावले. खासदार ए.टी.पाटील यांनी नागचाफा (नक्षत्र -आश्लेषा), महापौर लढ्ढा यांनी नागकेशराचे (नक्षत्र - अनुराधा) रोपटे लावले. जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल आणि पोलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांचे जन्म नक्षत्र माहिती नसल्याने त्यांच्या राशीनुसार वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी पळसाचे तर पोलिस अधीक्षकांनी फणसाचे रोपटे लावले. या वेळी ५४ वृक्षांची राेपे विविध मान्यवरांच्या हस्ते लावण्यात अाली. जन्म नक्षत्र अथवा राशीनुसार झाडे लावल्यास आयुष्य वाढते, असे शास्र सांगते. त्यामुळे मान्यवरांच्या हस्ते ही झाडे लावण्यात आली.

नक्षत्रानुसार राेपे लावल्याने अायुष्य वृद्धी
^प्रत्येक व्यक्तीच्या जन्म राशीनुसार लाभदायक वृक्ष निश्चित असते. त्याची जर लागवड केली तर अायुष्यात वृद्धी हाेत असल्याचे ज्याेतिष्य अभ्यासकांचे मानणे अाहे. त्यामुळेच लांडाेरखाेरीतील नक्षत्र वनात अाज मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या जन्म राशीला साजेसे वृक्ष लावण्यात अाले. - एन.जी. पाटील, वनसंरक्षक

लांडाेरखाेरीत २० प्रकारचे वन
लांडाेरखाेरीच्या१७३ एकर परिसरात जैवविविधता पार्क तयार करण्यात येत असून त्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. या ठिकाणी विविध धर्म, पंथ तसेच पौराणिक कथांमध्ये सांगितलेल्या महत्त्वानुसार झाडे लावण्यात येणार अाहेत. त्यामध्ये शिव पंचायत वन, नवग्रह वन, पंचवटी वन, इस्लाम वन, जैन वन, ख्रिचन वन, रामायण वन, बुद्ध वन, महाभारत, वन, गम वन, बायाे डिझेल वन, लाख वन, त्रिफळा वन, शीख वन, अॅराेमॅटिक वन, गुलाब वाटिका, बांबू वाटिका, फळवन, हर्बल गार्डन अादी वनांंची निर्मिती हाेत अाहे.

६० हजार वृक्षांची लागवड : शहरातीलशासकीय कार्यालय, प्रमुख सामाजिक संस्था, उद्याेग समूहांनी मिळून १० हजारांवर वृक्षलागवड केली. या व्यतिरिक्त शाळा, महाविद्यालय छाेट्या-छाेट्या अायाेजनातून सुमारे ५० हजारांवर वृक्षलागवड करण्यात अाली.

लांडोरखोरीत वृक्षारोपण करताना माजी मंत्री एकनाथ खडसे, सोबत आमदार गुरुमुख जगवानी.
१) जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्षारोपणानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल उपवनरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांच्यासोबत काढलेला सेल्फी. २) महापौर नितीन लढ्ढा ३) जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन ४) जळगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील.
बातम्या आणखी आहेत...