आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुपारपर्यंत भोजनालय बंदमुळे अादिवासी विद्यार्थी संतापले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खेडीरोडवरील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प प्रमुख अन् व्यवस्थापनापुढे गुरुवारी विविध समस्यांसह तक्रारींचा पाढा वाचून गृहपालाच्या बदलीसह निकृष्ट जेवण देणारा कंत्राटदार बदलण्याची मागणी केली. जोपर्यंत या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत जेवण घेण्यासह आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. तर भोजनालयातील कर्मचारी दुपारपर्यंत वसतिगृहात आल्याने भोजनालय बंद होते. यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकच संताप व्यक्त केला.
वसतिगृहातील विविध समस्यांबाबत तक्रारी मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना धमक्या दिल्यावरून गृहपाल सुशील तायडे यांची बदली करावी, ही मागणी लावून धरीत दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी वसतिगृहप्रमुखांपुढे नाराजी व्यक्त केली. या वेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी डी.एफ.तडवी, प्रकल्प अधिकारी एम.पी.राणे, भोजन विभागप्रमुख संतोष थेरोळकर यांनी वसतिगृहात येऊन विद्यार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या वेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नंदकुमार बिजलगावकर, अविनाश पवार, शिवाजी पवार, अमित पाटील, संदीप काळे यांनी प्रकल्पप्रमखांकडे विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मांडल्या. त्यांनी पाणीपुरवठ्यासह सुरक्षिततेच्या समस्या सोडवण्याचे आश्वासनही दिले.

विद्यार्थ्यांचीनिदर्शने : तसेचविद्यार्थ्यांनी वसतिगृहापासून पायी जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केले. तसेच जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना निवेदन देऊन समस्या मांडल्या. या वेळी रवींद्र गांगुर्डे, उमेश पाडवी, दिलीप पावरा, विनेश पावरा, हरिदास पांंडे उपस्थित होते.

दुपारपर्यंत भोजन रखडल्याने नाराजी
निकृष्ट भोजन मिळत असल्याने कंत्राटदार प्रदीप जैन यांचा ठेका रद्द करावा,गृहपाल सुशील तायडे यांची बदली करा, पदार्थांची गुणवत्ता तपासावी, शौचालयासह पुरेशा पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, या मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत भोजनाची पर्यायी व्यवस्था केल्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
जिल्हािधकारी कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करताना आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी.
आदीवासी वसतिगूहातील बंद असलेला भोजन कक्ष.