आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी मुलांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा; केली 47 किलोमीटरची पायपीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिवासी मुलींनी काढलेला मोर्चा. - Divya Marathi
आदिवासी मुलींनी काढलेला मोर्चा.
जळगाव/चोपडा- चोपडा येथील शासकीय आदिवासी मुली व मुलींनी विविध मागण्यासाठी चोपडा ते यावल एवढे अंतर 47 किलोमीटर अंतर पायपीट करून थेट यावल येथील आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयावर धडक दिली.

सकाळी 7 वाजता चोपडा येथून तब्बल 300 आदिवासी मुली आणि मुलांनी जामसिंग बारेला यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढत जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावल प्रकल्पातंर्गत येणाऱ्या आदिवासी मुलांनी चोपड्याहून यावल प्रकल्प कार्यालयावर थेट मोर्चा काढून अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. चोपडा कारगील चौकात यावल रोडवर विविध ठिकाणी आदिवासी मुलांना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. चोपडा येथील वसतिगृहामध्ये राहण्यासाठी कोटा वाढवून मिळावा ही या मुलांची मुख्य मागणी आहे. चोपडा येथे मुलाचे स्वतंत्र वसतिगृह व्हावे यासाठी शासकीय जागा व इमारत मंजूर करण्यात यावी.

 मुलीच्या वसतिगृहात 250 मुलींना प्रवेश मिळावा, मुलाचे वसतिगृहात 500 मुलांना प्रवेश मिळावा. वसतीगृहामध्ये रिक्त जागा असलेल्या जागांवर तात्काळ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, वंचित मुलांना तात्काळ प्रवेश मिळावा, मुलींच्या वसतिगृहात असलेल्या गृहपाल मनीषा सैंदाणेकर यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चात धारासिंग पावरा, संजय पाडवी,ओमाईला वसावे, सागर पावरा, आशा बारेला, अनिता पावरा, दिनेश बारेला सामील झाले होते.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...