आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी वसतिगृहाचे विद्यार्थी झाले आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-मूजे महाविद्यालय परिसरात असलेल्या आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मिळणार्‍या निकृष्ट दर्जाचे जेवण आणि इतर गैरसोयीच्या विरोधात बुधवारी विद्यार्थी आक्रमक झाले होते. अखेर विद्यार्थ्यांच्या संतापापुढे गृहपाल प्रवीण रोकडे यांनी माघार घेत मेसचालकाचा मक्ता रद्द करण्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला.
शहरात आठ ठिकाणी आदिवासी वसतिगृह आहे. गेल्या वर्षीही कासमवाडी येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या जेवणाच्या कारणामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन व्यथा मांडण्याचा प्रयत्‍न केला होता. तथापी बुधवारी मूजे महाविद्यालय परिसरातील वसतिगृहातील 85 विद्यार्थ्यांनी भोजनावर बहिष्कार टाकून नियमानुसार ठरलेल्या दज्रेदार जेवणाची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या संतापापुढे गृहपालांना माघार घ्यावी लागली. मेसचे मक्तेदार जितेंद्र बागडे यांचा मक्ता रद्द करण्यात यावा, असा अहवाल वरिष्ठांना पाठवला. वसतिगृहातील अक्रम तडवी, किसन पावरा, सुनील बारेला यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
या आहेत मागण्या
विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण निकृष्ट असल्यामुळे सध्याचा मक्ता रद्द करावा. वसतिगृहाने मेसचा मक्ता न देता शासन नियमात बसत असल्यामुळे दर महिन्याला विद्यार्थ्यांना जेवण खर्चापोटी देण्यात येणारी रक्कम खात्यावर जमा करावी.
इतर सुविधांचीही वानवा
आंदोलनामुळे वसतिगृहातील इतर असुविधाही चव्हाट्यावर आल्या. विद्यार्थ्यांचे आंदोलन शांत करण्यासाठी वसतिगृहात आलेले हाऊस मास्टर डी. एफ. तडवी यांनाही विद्यार्थ्यांनी धारेवर धरले. शासन नियमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा का मिळत नाहीत? या एकाच प्रश्‍नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी मागितले. वातावरण तापल्यानंतर रोकडे आणि तडवी यांनी वरिष्ठांकडे आपल्या भावना पोहोचवून लवकरात लवकर योग्य त्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सध्याचा मेसचा मक्ता रद्द केला आहे. बुधवारपासूनच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. इतर गैरसोयींच्या बाबतीत शासनाकडे पाठपुरावा करून सुविधा देण्याचा प्रय} केला आहे. प्रवीण रोकडे, गृहपाल.