आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी प्रकरणात 5 जणांविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - उच्चभ्रू परिवारातील महिलेकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सरिता माळीसह पाच जणांविरुद्ध नव्याने गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.देवरे यांनी पुनर्विलोकन अर्जात दिलेल्या निकालानुसार दिले आहेत. या आदेशामुळे पोलिसांची कारवाई कायदेशीर असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

'तुझ्या नवऱ्याला कारागृहामध्ये जाण्यापासून वाचवायचे असेल, तर एक कोटी रुपये दे; नाही तर तुझ्या नवऱ्याविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करेन' अशी धमकी सरिता माळीने दिली.
या कटात भारती म्हस्के, वैशाली विसपुते, जयश्री झांबरे योगेश वाणी हे चाैघेही सहभागी असल्याची तक्रार संबंधित महिलेने अॅड.जैनोद्दीन शेख संतोष सांगोळकर यांच्यामार्फत प्रथम
वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाखले यांच्या न्यायालयात दिली होती.
पाचही आरोपींविरुद्ध पुरावे
यासंदर्भात स्थगिती अादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मूळ प्रकरणाची फाइल शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.देवरे यांच्या न्यायालयासमोर आली असता, त्यांनी सत्र
न्यायालयाच्या निकालानुसार जिल्हापेठ पोलिसांनी या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे नव्याने आदेश दिले. दरम्यान, खुलासा सादर करताना तपासाधिकारी सुप्रिया
देशमुख यांनी अारोपींविरुद्ध पुरावे मिळाले असल्याचे म्हटले होते.
न्यायालयाची पोलिसांना नोटीस
केवळसरिता माळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असताना पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिकाराची मर्यादा ओलांडल्याबाबत संशयितांनी
न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांकडून स्पष्टीकरण मागवणारी नोटीस दिली होती. तर पीडिताचे वकील अॅड.जैनोद्दीन शेख यांनी पुनर्विलोकन
अर्जाच्या कामात न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना बजावलेल्या नोटिशीला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज केला होता.