आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपघातात केबिनमध्ये फसलेल्या चालकास सुखरूप काढले बाहेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महामार्गावर धावत्या ट्रकचा एक्सेल तुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती समाेरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर धडकल्याने अपघात झाल्याची घटना पाळधीच्या माताेश्री हाॅटेलजवळ रविवारी पहाटे ४.४५ वाजता घडली. अपघातात गंभीर झालेल्या चालकाला एक तास प्रयत्न करून ‘दिव्य मराठी’च्या प्रिंटिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी केबिनमधून बाहेर काढून तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. दरम्यान घटनेनंतर दुसरा ट्रक चालक फरार झाला अाहे.
अाेडिसा येथील ट्रक (क्रमांक अाेडी ०७ एल ७६३१) जळगावकडून धुळ्याकडे जात हाेता तर एरंडोलकडून जळगावकडे गुजरातचा ट्रक (क्रमांक जीजे १० डब्ल्यू ५५७७) येत हाेता. गुजरातच्या धावत्या ट्रकचा एक्सेल माताेश्री हॉटेलजवळ तुटला ताे ट्रक समाेरून येणाऱ्या ट्रकवर येऊन धडकला. अपघातात अाेडिसाच्या ट्रकचा चालक केबिनमध्येच दाबला गेला. त्याच्या दाेन्ही पायाला गंभीर दुखापत हाेऊन ताे विव्हळत पडला हाेता. या वेळी ‘दिव्य मराठी’च्या पाळधी येथील प्रिंटिंग युनिटमधून काम अाटाेपून घरी जाणारे कमलाकर घरटे, अभिजित चांद गुडे, अतुल पाटील, शशिकांत देशमुख, परेश अमृतकर चालक अजय जाधव यांना ही घटना दिसली. त्यांनी क्षणाचाही विलंब करता जखमी चालकाला केबिनमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आेडिसाच्या ट्रकची केबिन अपघातात दाबली गेल्याने जखमी चालकाला बाहेर काढता येत नव्हते. त्यामुळे शेजारी असलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन पंप मालकाच्या बुलडाेझरने राेप-वायरच्या मदतीने तासाभरात चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात अाले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला बाेलावून जखमी चालकाला रवाना करण्यात अाले. याप्रकरणी तालुका पोलिसात अपघाताची नाेंद करण्यात अाली अाहे. रात्री उशीरापर्यत चालक शुध्दीवर अाल्याने त्याचे नाव कळू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...