आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अचानक वळण घेणाऱ्या माल ट्रकवर दुचाकी धडकली; तरुण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महामार्गावर कालिंका माता चौकात बुधवारी सायंकाळी अचानक वळण घेतलेल्या एका ट्रकवर दुचाकी धडकली. धडक एवढी जोरात होती की, तरुण दुचाकीस्वार दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
 
सायंकाळी तिन्ही सांजेच्या वेळी झालेल्या अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.जमावाचा रुद्रावतार पाहून ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, दुचाकीस्वाराची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव समाधान ऊर्फ सनी बळीराम खरोटे ( वय १९) असून त्यासोबतच शुभम देविदास पाटील ( वय २१) हा तरुणही जखमी झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास समाधान अयाेध्यानगराकडून दुचाकीने कालिंका माता चौकाकडे येत हाेता. कमल लाॅन समाेर असलेल्या ए-वन भरीत सेंटर जवळून त्याचवेळी ट्रक महामार्गावरूनच कालिंकामाता चाैफुलीकडे वळण घेत हाेता. 

ट्रकचालकाने अचानक वळण घेतल्याने अयाेध्यानगरकडून येणाऱ्या समाधान खराेटेची दुचाकी (क्र. एमएच-१९-बीबी-२५९३) ट्रकवर जाेरात धडकली. ट्रकची धडक बसल्याने समाधान फेकला गेला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. 

अपघात झाल्याचे कळताच समाधानचे मित्र घटनास्थळावर पाेहाेचले. त्या वेळी संतप्त जमावाने दगड मारून ट्रकचे काच फाेडले. त्यानंतर काही तरुणांनी ट्रक पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. या वेळी शुभम देविदास पाटील (वय २१) हा युवक जखमी झाला. उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे, एमअायडीसी पाेलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर पाेहाेचल्यानंतर त्यांनी जमावाला पांगवले. 

एकतास महामार्ग ठप्प 
ट्रक वळण घेत असताना अपघात घडला. त्यामुळे चालक रस्त्यावर ट्रक (क्र. एमएच-१८-एम-५७०१) अाडवा साेडून घटनास्थळावरून फरार झाला. त्यामुळे दाेन्ही बाजूची वाहतूक एक तास ठप्प झाली हाेती. पाेलिसांनी काही वेळानंतर क्रेन मागवून ट्रकला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
 
जिल्हा सामान्य रुग्णालयात मित्रांचा गाेंधळ 
अपघात झाल्यानंतर अाजूबाजूच्या काही नागरिकांनी समाधानला ट्रकच्या खालून बाहेर काढले. त्याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झालेली हाेती. त्यामुळे त्यांनी तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बाेलावून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. काहीवेळानंतर समाधान याचे मित्र सिव्हिलमध्ये पाेहाेचले. त्यांनी सिव्हिलच्या डाॅक्टर अाणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून गाेंधळ घातला. त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. 

अपघातानंतर संतप्त जमावाने दगडफेक करून ट्रक पेटवण्याचा प्रयत्न केला. ट्रकवर फेकलेले आगीचे बोळे विझवताना पोलिस कर्मचारी. वरच्या चौकटीत अपघातात जखमी झालेला तरूण. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...