आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकची दोन वाहनांना धडक, ठार; जखमी, नेर तालुक्यातील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- भरधाव वेगात अमरावतीकडे जाणाऱ्या ट्रकने दोन वाहनाला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना नेर तालुक्यातील दोडकी फाट्यावर आज दि. २१ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेबाबत प्राप्त माहितीनुसार, नेर येथून अमरावतीकडे भरधाव वेगात सिमेंट घेऊन जाणाऱ्या एमएच-४०- ८४९० क्रमांकाच्या ट्रकने नेर तालुक्यातील दोडकी फाट्याजवळ अमरावतीकडून नेरकडे येणाऱ्या मॅक्स पिकअप एमएच-४२-३३८७ ला धडक दिली. तसेच ट्रकने एमएच-२७-३६४८ क्रमांकाच्या मॅक्स पिकअप या वाहनाला धडक दिली. यामध्ये मॅक्स पिकअपचा चालक इम्रान खान वय ४० वर्ष रा. लाडखेड हा जागीच ठार झाला. तर शेख शारीक शेख गफ्फार वय २१ वर्ष रा. लाडखेड आणि मॅजीकचा चालक असद खा इसुफ खा वय २५ वर्ष रा. हनुमान नगर अमरावती हे गंभीर जखमी झाले. त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ धाव घेवून पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.