जळगाव - शिवजयंती उत्सवात गेंदालाल मिल परिसरात डीजे वाजवणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांवर रविवारी रात्री ११.४५ वाजता शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. तसेच डीजेही जप्त केले.
गेंदालाल मिल परिसरातील छत्रपती उत्सव समितीतर्फे रविवारी मिरवणूक काढण्यात अाली हाेती. त्या वेळी डीजे लावण्यात अालेला हाेता. रात्री उशिरापर्यंत डीजे सुरू हाेता. याप्रकरणी शहर पाेलिस ठाण्यात नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पाेलिस कर्मचाऱ्यांनी डीजेचे स्पीकर ठेवलेली ट्रक (क्रंमाक एमएच-०३-एन-६५३४) जप्त केली. तसेच पाेलिस हवालदार भालचंद्र देसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडळाचे माेहन केळकर, शहाजी खाेंज, रमेश चव्हाण, विजय पाटील, कमलेश जयस्वाल, कुणाल हटकर, दीपक साेनवणे, सुरेश साेनवणे, डीजेचा मालक याेगेश राजकुमार गवळी (रा. इंद्रप्रस्थनगर) व डीजे अाॅपरेटर अजय अशाेक काेळी यांच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला.