आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे ट्रॅव्हल्स-ट्रकमध्ये भीषण अपघात, चालकांसह दहा जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगाव-औरंगाबाद राज्यमार्गावर चिंचोली व उमाळ्याच्या दरम्यान ट्रक व खासगी ट्रॅव्हल्सवर आदळला. ट्रॅव्हल्सचा स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे हा अपघात झाला. सुदैवाने यात जीवीतहानी झाली नाही. आज (मंगळवार)  दुपारी 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.
 
जामनेर येथील बेदमुथा ट्रॅव्हल्स काही मजुर, कर्मचाऱ्यांना घेऊन जळगावकडे येत होती. तर जळगाव शहरातून फत्तेपूर येथे मका भरण्यासाठी भगवती रोडलाईन्सचा रिकामा ट्रक निघाला होता. उमाळा फाटा ओलांडून ट्रॅव्हल्स काही अंतरावर आली असता तिचा स्टेअरींग रॉड तुटला. याचवेळी समोर डाव्या बाजुला धोकादायक वळण होते. स्टेअरींग रॉड तुटल्यामुळे ट्रॅव्हल्स वळवणे चालकाला शक्य झाले नाही. त्यामुळे वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकवर ट्रॅव्हल्स आदळला. सुदैवाने दोनही वाहनांची गती कमी असल्यामुळे प्राणहाणी झाली नाही.

बस चालक कैलास रामलाल जाधव (वय 50, रा.खादगाव, ता.जामनेर) व ट्रकचालक भिकुभाई अब्दुलभाई काछेला (वय 55, रा.महुआ, गुजरात) हे दोघे जखमी झाले. काछेला यांच्या डाव्या डोळ्याच्या खाली दुखापत झाली. तर जाधव यांचा उजवा पायाचा पंजाला दुखापत झाली. या शिवाय ट्रकचा क्लिनर मनसुखसह ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणारे आठ ते दहा जणांना मुक्कामार लागला. सर्व जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात आणण्यात आले होते. प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्ररकणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...