आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात मिनी ट्रक-मोटरसायकलचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- मिनी ट्रक आणि मोटारसायकलचा भीषण अपघात होऊन त्यात एकाच कुटुंबातील सहा जणांना मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. रांजणगाव फाट्याजवळ हा सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला.

मिळालेली माहिती अशी की, मिनी ट्रक आणि मोटरसायकलची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. सात पैकी सहा जण चव्हाण कुटुंबातील सदस्य आहेत. दोघे गंभीर जखमी आहेत. त्यापैकी एकाला धुळे येथील सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर बोधरे गावातील चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
मृतांची नावे...
- नामदेव नरसींग चव्हाण
- शिलाबाई नामदेव चव्हाण
- मितेश नामदेव चव्हाण
- राजेंद्र गलसींग चव्हाण
- पप्पु तुकाराम चव्हाण
- मिथुन रुंगदेव चव्हाण
- पंडीत बाबु जाधव

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो आणि मृतांची फोटो
 
 
बातम्या आणखी आहेत...