आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवापूरजवळ ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघात; चालकांसह 12 प्रवाशी गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवापूर- सुरत-नागपूर- महामार्ग क्रमांक सहावर नवरंग रेल्वे गेटजवळ ट्रक आणि खासगी बसची भीषण धडक झाल्याने अपघात झाला. यात दोन्ही चालकांसह दहा-बारा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदूर-सुरत ही खासगी बस धुळ्याकडून सुरतकडे जात असताना समोरून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. आज (शनिवारी) सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. जखमींना नवापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालक राजेंद्र लक्ष्मण बडगुजर (42, रा. उंदीरखेडा, ता. पारोळा जि. जळगाव), बसचालक सीताराम गिरिष चौथमल (30, रा.इंदूर, मध्यप्रदेश), प्रवाशी मुन्नाश्री बालमुकुंद ठाकूर (52, रा. कसली, ग्वॉल्हेर, मध्यप्रदेश) हे तिघे गंभीर जखमी झाले असल्यात माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ अविनाश मावची यांनी दिली आहे.

ट्रकचालक ट्रकच्या कॅबीनमध्ये अडकला होता. त्याला पत्रा कापून बाहेर काढण्यात आले. 108 रूग्णावहिकेचा पायलट लाजरेश गावित व डॉक्टरांनी मोठे परिश्रम घेऊन चालकावर तातडीने उपचार सुरु केले. सुदैवाने चालकाचे प्राण वाचले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, अपघातग्रस्त खासगी बस आणि ट्रकचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...