आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक चालकाने पोलिस ठाण्याचे गेट उडवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला कट मारून पुढे जाणाऱ्या ट्रकला थांबवण्याचा प्रयत्न केेला असता, ट्रकचालकाने पाेलिसांना जुमानता ट्रक भरधाव पळवण्याचा प्रयत्न केला. तर याच ट्रकने पाेलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराला धडक दिल्याची घटना शनिवारी घडली.
ट्रक चालक प्रभू मघदम गिरी (वय २८, रा. सिवान, बिहार) हा एरंडोलकडून शनिवारी दुपारी वाजता ट्रक क्र. डब्ल्यू बी-२३-सी-११५६ घेऊन येत होता. त्याने दादावाडी परिसरात विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला कट मारला. त्याला शहर वाहतूक पाेलिस शाखेच्या कर्मचाऱ्याने थांबण्यास सांगितले. मात्र, ताे थांबता शहराच्या दिशेने सुसाट वेगाने निघाला. त्याने अाणखीन एका रिक्षाला कट मारला. त्या वेळी एरंडोलकडून येणाऱ्या एका बाेलेराे कारला वाहतूक पाेलिसांनी थांबवले. त्यानंतर ट्रकचा पाठलाग केला. त्याला पाेलिसांनी शासकीय अायटीअाय विद्यालयाजवळ पकडले. ट्रकचालक मद्यधुंद हाेता. त्याला ताब्यात घेतले. ताे भारतनगर (सुरत) येथून काेलकात्याकडे ट्रक घेऊन जात हाेता. वाहतूक पाेलिसांनी त्याला पकडून जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात अाणले. त्या वेळी त्याने जिल्हापेठ पाेलिस ठाण्याच्या अावारात ट्रक घालत असताना गेटला जोरदार धडक दिली. याप्रकरणी पाेलिसांनी ट्रक मालक उजीर अहमद (काेलकाता) यांच्याशी संपर्क केला. त्यांनी झालेले नुकसान भरून देण्याचे सांगितले.

आत्महत्येच्या धमकीने पोलिसांची तारांबळ
कंजरवाड्यातील रामप्रकाश तमाईचेकर याच्या पत्नीला परिसरातील काहीजणांनी मारहाण केल्याने त्यांनी शुक्रवारी एमअायीसी पाेलिस ठाण्यात तक्रार दिली हाेती. याप्रकरणी एमअायडीसी पाेलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नाेंदही करण्यात अाली. मात्र, संबंधितांवर पाेलिसांनी काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे रामप्रकाश सुरुवातीला एमअायडीसी ठाण्यात गेला. त्यानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयात गेला. मात्र, तेथे त्याची कुणाशीच भेट झाली नाही. शनिवारी सकाळी पुन्हा त्याने पत्नीसह जाऊन एमआयडीसी पाेलिसात कारवाई करण्यासाठी गाेंधळ घातला. त्यानंतर ताे जिल्हा पाेलिस अधीक्षक कार्यालयात अाला. त्या ठिकाणी दिवसभर थांबल्यानंतर त्याला पाेलिस अधीक्षकांना काेणीच भेटू देत नव्हते. त्यामुळे ताे हातात दाेर घेऊन सायंकाळी ६.१५ वाजता रणगाड्याजवळील कडुलिंबाच्या झाडावर चढला. तेथे त्याने मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा नाही. तर अात्महत्या करताे, अशी धमकी दिली. जिल्हापेठ पाेलिसांनी त्यास समजावून एक तासानंतर खाली उतरवले. त्यानंतर त्याला डीवायएसपी सचिन सांगळे यांची भेट घालून दिली.

अनेक गुन्हे दाखल :
रामप्रकाश तमाईचेकर याच्यावर शहर, एमआयडीसी, जिल्हापेठ, शनिपेठ, भुसावळ, चाळीसगाव, धुळे, सिल्लोड, सटाणा येथे बॅगचाेरी, जबरी चाेरी, घरफाेडीचे अनेक गुन्हे दाखल अाहेत.
बातम्या आणखी आहेत...