आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढे शहरात ट्रकद्वारे येणार्‍या संशयास्पद मालाचीच तपासणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ट्रकद्वारे आलेल्या सर्वच मालाची तपासणी न करता ज्या मालाच्या कागदपत्रासंदर्भात संशय असेल त्या मालाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ट्रान्सपोर्टचालकांनी केली आहे. यास बुधवारी पालिकेत झालेल्या बैठकीत अनुकुलता दर्शविण्यात आली आहे.

व्यापारी शहरात सांकेतिक किंवा संशयास्पद नावाने माल मागवतात. यातून करचुकवेगिरीचे प्रकार होतात, याला आळा घालण्यासाठी ट्रान्सपोर्टचालकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बैठकीत केले. त्यानंतर ट्रान्सपोर्टचालकांनीही आपल्या अडचणी सांगितल्या. या वेळी उपायुक्त प्रदीप देशमुख, एलबीटीचे सहायक आयुक्त उदय पाटील, कर अधीक्षक सतीश शुक्ल, गोल्डन ट्रान्सपोर्ट, आरको, जितेंद्र ट्रान्सपोर्ट, राणा ट्रान्सपोर्ट, हकिमे गोल्ड, गोपी रोडवेज, बॉम्बे-महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट, गिरनार रोडवेज यासह 20 ते 22 ट्रान्सपोर्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.